31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयमाझ्या घरावर मोर्चा येणार; मंत्री आव्हाडांनी ट्वीट करून दिली माहिती

माझ्या घरावर मोर्चा येणार; मंत्री आव्हाडांनी ट्वीट करून दिली माहिती

टीम लय भारी

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 2 दिवसांपूर्वी ठाण्यात जाहीर सभेत ओबीसी समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर अनेक राजकीय पक्ष आणि ओबीसी समाजातील नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती, दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या घरावर मोर्चा निघणार असून पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल केलेल्या आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, उद्या माझ्या घरावर मोर्चा येणार आहे, असे समजले(Morcha will come to my house; Information by Awhad tweeted).

ओबीसी बाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोर्चा येणार असल्याचे केले होते ट्वीट केले आहे. मागील वेळेस झालेला राडा पाहून पोलीस आधीपासून सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे. एक क्यू आर टी टीम आणि सिटी पोलीस तैनात करण्यात आले असून 100 पोलीस सध्या बंदोबस्तात आहेत.

बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांवर संतापले

ओबीसींवर फारसा विश्वास नाही : जितेंद्र आव्हाड

ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. त्यावेळी आरक्षणावर बोलताना आव्हाड यांनी ओबीसी समाजाबाबत एक वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

म्हाडाची २९ आणि ३० जानेवारीला होणारी परीक्षा रद्द

Maharashtra Minister Jitendra Awhad’s remarks on OBCs sparks row

आव्हाडांच्या घरासमोर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या घरासमोर मोठी गर्दी केली आहे. यापूर्वी म्हाडा परीक्षा रद्द झाल्याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन केले होते. मात्र, आता सध्या आव्हाडांनी ओबीसी आरक्षणाबाबत केलेल्या विधानामुळे ते चर्चेत आहेत. त्यांच्यावर अनेकांनी टाकाही केली. त्याबद्दल तर हे आंदोलन नाही ना, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी