34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeसिनेमाअक्षय कुमारच्या आईचे निधन, 'ती माझा आधार होती' अशा शब्दात केला मातृशोक...

अक्षय कुमारच्या आईचे निधन, ‘ती माझा आधार होती’ अशा शब्दात केला मातृशोक व्यक्त

टीम लय भारी

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार ह्याची आई अरुणा भाटिया यांचे बुधवार 8 सप्टेंबर रोजी सकाळी निधन झाले आहे. स्वतः अक्षय कुमार याने ट्विट करत याची माहिती दिली आहे (Akshay Kumar mother Aruna Bhatia passed away).

अक्षय कुमारची आई अरुणा ह्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. मुंबईतल्या हिरानंदानी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. आईची प्रकृती गंभीर आहे हे समजताच अक्षय कुमार 6 सप्टेंबर रोजीच युकेहुन मुंबईत परतला होता. माझ्या आईसाठी प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. माझ्यासाठी प्रत्येक तास कठीण आहे, अशी त्याने पोस्ट केली होती (Akshay Kumar mother Aruna had been ill for the past few days).

आशा भोसलेंनी वयाच्या 88 व्या वर्षी मराठी चित्रपटासाठी गायले गाणे

‘बसपन का प्यार’ गाणाऱ्या मुलाचे आणखी एक गाणे व्हायरल

आज सकाळीच आय. सी. यु. मध्ये उपचारादरम्यान अरुणा ह्यांचे निधन झाले. आपल्या चाहत्यांसोबत आईच्या निधनाची बातमी अक्षय कुमारने शेअर केली. ‘ती माझा आधार होती. आज मला असह्य दुःख होत आहे. माझ्या आईने आज सकाळी ह्या जगाचा निरोप घेतला आहे. माझ्या वडिलांशी तिची दुसऱ्या जगात पुनरभेट झाली आहे. तुम्ही या दुःखद प्रसंगी केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो.’ अशा शब्दात अक्षय कुमारने मातृशोक व्यक्त केला आहे (Akshay Kumar has expressed motherly grief).

Akshay Kumar mother Aruna Bhatia passed away
आईच्या मृत्यूची बातमी देत अक्षय कुमारने शोक व्यक्त केला

अभिनेता रजत बेदीच्या कारची पादचाऱ्याला धडक

When an emotional Aruna Bhatia recalled how well Akshay Kumar handled everything after his father died: ‘My pain reduced’

अरुणा भाटिया यांच्या गुडघ्यांवर काही वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. अरुणा भाटिया ह्या निर्मात्या होत्या. त्यांनी हॉलीडे, रुस्तम यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे (Aruna Bhatia was the producer. He has produced films like Holiday, Rustam).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी