30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeटॉप न्यूजOla इलेक्ट्रिक बाजारात दाखल, ऑनलाइन विक्रीला सुरूवात

Ola इलेक्ट्रिक बाजारात दाखल, ऑनलाइन विक्रीला सुरूवात

टीम लय भारी

मुंबई : जुलै महिन्यात ओला इलेकट्रीक कपंनीने विजेवर चालणाऱ्या दुचाकी बाजारात आणण्याबाबत घोषणा केली होती. या दुचाकी ऑनलाईन विक्रीसाठी आजपासून उपलब्ध झाल्या आहेत (Ola Electric Company announced the launch of an electric two-wheeler. These bikes are available for sale online from today).

गेल्या महिन्यात फक्त ४९९ रुपयांमध्ये स्कूटरच्या प्री-बुकिंगला सुरूवात केली होती. ज्यांनी स्कूटरसाठी बुकिंग केले होते ते ग्राहक आता उर्वरित रक्कम भरून आणि स्कूटरचा रंग व व्हेरिअंट ठरवून ही स्कूटर खरेदी करू शकणार आहेत. असे ओला कंपनीने जाहीर केले आहे.

‘माझ्याकडे सत्ताधाऱ्याना गुद्दे द्यायला बरेच मुद्दे आहेत’

सर्वदूर अंधार आहे त्यावर आधी दिवे लावा नंतर दुसर्यांचा अंधार पहा : चित्र वाघ

उर्वरित संपूर्ण रक्कम भरून डिलीव्हरीला ऑक्टोबरमध्ये सुरूवात होईल आणि कंपनी डायरेक्ट-टू-होम डिलीवरी रूटद्वारे स्कूटरची डिलिव्हरी करेल. ‘आम्ही स्कूटरची होम डिलिव्हरी करणार असून खरोखर स्कूटर ग्राहकाच्या दरवाजापर्यंत पोहोचवणार आहोत.’ असे कंपनीचे प्रतिनिधी वरुण दुबे यांनी सांगितले आहे.

Ola S1 Electric Scooter आणि Ola S1 Pro Electric Scooter अशा दोन व्हेरिअंट्समध्ये लाँच केली. Ola S1 Electric Scooter ची एक्स-शोरूम किंमत ९९,९९९ रुपये आहे, तर S1 Pro ची एक्स-शोरूम किंमत १,२९,९९९ रुपये आहे. दरम्यान, केंद्राची फेम स्कीम आणि राज्य सरकारकडून मिळालेली सब्सिडी यामुळे महाराष्ट्रात Ola S1 ची किंमत ९४,९९९ रुपये आणि Ola S1 Pro ची किंमत १,२४,९९९ रुपये आहे.

‘आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत’

Ola Electric
Ola S1 Electric Scooter आणि Ola S1 Pro Electric Scooter अशा दोन व्हेरिअंट्समध्ये लाँच

Zero to 10 million: five challenges Bhavish Aggarwal must overcome to scale Ola’s electric dream

ही इलेक्ट्रिक स्कूटर रिव्हर्समध्येही चालवता येते. यामध्ये ७ इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आणि इन-बिल्ट स्पीकरही आहेत. या स्कूटरमध्ये कंपनीने 4G कनेक्टिविटी सिस्टिम दिली आहे. व्हॉइस कंट्रोल आणि प्रॉक्सिमिटी अनलॉक फीचर आहे. शिवाय की-लेस फीचरमुळे चावीची गरज लागत नाही. फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक्स तसेत दोन हेल्मेट ठेवता येतील इतका मोठा बूट स्पेस मिळतो. Ola इलेक्ट्रिक स्कूटरसाठी कंपनीने -नॉर्मल, स्पोर्ट आणि हायपर असे तीन निरनिराळे ड्रायव्हिंग मोड्स दिले आहेत.

ओला इलेक्ट्रिकने आपल्या ग्राहकांना सहजपणे कर्जाची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी HDFC Bank एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा प्राइम आणि टाटा कॅपिटल सह विविध प्रमुख बँक आणि वित्तीय संस्थांशी भागीदारीही केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी