34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeसिनेमाअभिनेत्री अमृता रावच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

अभिनेत्री अमृता रावच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

टीम लय भारी

मुंबई  l  बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अमृता आणि तिचा पती आरजे अनमोल पहिल्यांदाच आई-बाबा झाले आहेत. ही आनंदाची बातमी अमृता-अनमोलच्या टीमने शेअर केली आहे.

अमृता आणि अनमोलने २०१६ मध्ये लग्न केलं. त्यापूर्वी जवळपास ७ वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. अमृताने २००२ मध्ये कलाविश्वात पदार्पण केलं.

त्यानंतर ‘इश्क-विश्क’, ‘विवाह’ या चित्रपटांमुळे ती प्रकाशझोतात आली. या दोन्ही चित्रपटात तिने शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती.

अमृताचा कलाविश्वातील वावर आता कमी झाला आहे. काही मोजक्या चित्रपटांच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेली ही अभिनेत्री ‘विवाह’ चित्रपटानंतर खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली.

मात्र, त्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. परंतु, अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनमोल आणि अमृता पहिल्यांदाच आई-बाबा झाले आहेत.

तसंच तिने ‘मैं हूँ ना’, ‘सत्याग्रह’, ‘मस्ती’, ‘वाह लाइफ हो तो एैसी’, ‘प्यारे मोहन’, ‘वेलकम टू सज्जनपूर’, ‘विक्ट्री’, ‘लाइफ पार्टनर’, ‘जॉली एलएलबी’, ‘सिंह साहेब द ग्रेट’, ‘शौर्य’ यासारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी