30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयकोल्हापुरात भक्तीमय विचारांचे पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन ५ ते ६ एप्रिलला...

कोल्हापुरात भक्तीमय विचारांचे पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन ५ ते ६ एप्रिलला होणार

टीम लय भारी

कोल्हापुरात पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ५ ते ६ एप्रिल २०२२ रोजी हा भक्तीमय विचारांचा ठेवा असणार आहे. याबाया संमेलनाचे अध्यक्ष भारत सरकार कंपनी लवादाचे सदस्य ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. डॉ. मदन महाराज गोसावी हे स्वतः व संमेलन स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे हे पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे दिनांक १९ मार्च २०२२ रोजी दुपारी १२ वाजता संमेलनाची माहिती देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन, सैनिक दरबार हॉल, बावडा, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.

मदन महाराज गोसावी यांचा जन्म सातारा जिल्ह्यात झाला.अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत विधी शाखेतून त्यांचे शिक्षण झाले.पुढे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी न्यायाधिश पदावर काम केले.याशिवाय मंत्रालयात विधी व न्याय खात्याचे सहसचिव म्हणूनही काम केले आहे. अनेक कायदेविषयक शिबीरांचे आयोजन,संतांच्या ग्रंथांचे वाचन व्हावे म्हणून त्यांनी गावोगावी ज्ञानेश्वरी व गाथा अभ्यासवर्ग सुरु केले आहेत.

सध्या अहमदाबाद येथे राष्ट्रीय कंपनी लवादाचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहे.उच्चपदस्थ अधिकारी असूनही महाराष्ट्रभर त्यांनी कीर्तन प्रवचनांतून जनजागृतीचे खूप मोठे काम केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी