31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeसिनेमाBigg Boss 14 l जान सानूने माझ्या मर्जीविरोधात किस केलं?; निक्की तांबोळीचा...

Bigg Boss 14 l जान सानूने माझ्या मर्जीविरोधात किस केलं?; निक्की तांबोळीचा आरोप

टीम लय भारी

मुंबई l ‘बिग बॉस १४’ मधील स्पर्धक जान सानूवर निक्की तांबोळीने गंभीर आरोप केले आहेत. मराठी भाषेविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा जान सानू किस प्रकरणावर अडचणीत आला आहे. निक्की तांबोळीने जानला तू बाहेर जा, अशी धमकीही दिली आहे.

बिग बॉसने दिलेल्या टास्कदरम्यान घरातील प्रत्येक स्पर्धकाला त्यांच्या दोन प्रतिस्पर्ध्यांची नावं तुरुंगात टाकण्यासाठी नॉमिनेट करायची आहेत. या टास्कदरम्यान निक्कीने जानचं नाव घेतलं.

जान सानूवर  आरोप करत ती म्हणाली, “मुलीच्या मर्जीविरोधात तिचं चुंबन  घेणं चुकीचं असतं. यासाठी तुला तुरुंगात जावंच लागेल.” कॅप्टन बनलेल्या अली गोनीनेही निक्कीची  साथ दिली. त्यानेसुद्धा जानला खडेबोल सुनावले.

निक्कीच्या आरोपांवर जानने प्रतिप्रश्न केला. “जर मी तिच्या मर्जीविरुद्ध चुंबन घेतलं, तर मग तिने पुन्हा मला का चुंबन दिलं”, असा प्रश्न त्याने विचारला. या प्रकरणावरून निक्की आणि जान सानू   यांच्याच चांगलाच वाद रंगला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी