31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयअर्जेंटिनाचे भारतातील राजदूत हुगो गोबींनी घेतली मुंबई महापौर किशोरी पेडणेकरांची भेट

अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत हुगो गोबींनी घेतली मुंबई महापौर किशोरी पेडणेकरांची भेट

संदिप रणपिसे : टीम लय भारी

मुंबई : अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत हुगो गोबी यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची सदिच्छा भेट घेतली आहे. भायखळा येथील महापौरांच्या निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतली आहे. या वेळी पेडणेकर यांनी कोविड काळात परिचारिका म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल गोबींनी त्यांचे कौतुक केले (Mumbai Mayor Kishori Pednekar met Ambassador of Argentina Hugo Gobi).

गोबी यांची मुलगी देखील परिचारिका आहे. त्यामुळे मला परिचारिका यांची सेवावृत्ती याची चांगली जाणीव आहे, असे गोबी म्हणाले. महापालिका शाळेतील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण मिळावे यासाठी ब्यूनास आयर्स व मुंबई महानगरपालिका यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

शरद पवारांनी मोदी – योगी सरकारवर ओढला आसूड

शिर्डीच्या साई संस्थानाकडून भाविकांसाठी नियमावली जाहीर

त्याचप्रमाणे महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेले काम, महिला सक्षमीकरण तसेच स्टार्टअप उद्योगाला चालना देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध परवानगी मिळविण्यासाठी केलेल्या सुसूत्रीकरणाची व सेवासुविधांची माहिती दिली.

त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी श्री. हुगो गोबी व इतर मान्यवरांचे शाल, बृहन्मुंबई महानगरपालिकेची नागरी दैनंदिनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित बृहन्मुंबई महानगरपालिकेने तयार केलेले कॉफीटेबल बुक तसेच पुष्पकुंडी देऊन स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महापौर निवासस्थानाच्या आवारात जायफळ तसेच शोभिवंत झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

शरद पवार लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावर संतापले, आणि म्हणाले…

‘My students, My responsibility’: Maharashtra state govt launches campaign to help bridge the learning divide

यानंतर मान्यवरांनी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनची पाहणी करून आनंद व्यक्त केला. तसेच पाबलो राँमिरेज या अर्जेंटिनाच्या चित्रकाराने पेग्विनच्या प्रवेशद्वाराजवळ काढलेल्या चित्राची मान्यवरांनी पाहणी करून आनंद व्यक्त केला. त्यासोबतच दीडशे वर्ष जुन्या नर्सरीला भेट देऊन सेंचुरी पाम वृक्षसंवर्धनाची माहिती घेतली.

अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत हुगो गोबींनी घेतली मुंबई महापौर किशोरी पेडणेकरांची भेट

ऐंशी ते शंभर वर्षातून फक्त एकदा फुल येणाऱ्या सेंचुरी पाम वृक्षाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जतन व संवर्धन करण्याबाबत दिलेल्या सूचनांची माहिती यावेळी मान्यवरांना देण्यात आली. दुर्मिळ प्रजातीचे वृक्ष संवर्धन चांगल्या पद्धतीने करण्यात येत असल्याबद्दल मान्यवरांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले तसेच संबंधित अधिकारी उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांचे अभिनंदन केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी