34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमनोरंजनपूजा ददलानीला मुंबई पोलिसांचं समन्स, पूजा म्हणते, ‘माझी तब्येत बरोबर नाही, नंतर...

पूजा ददलानीला मुंबई पोलिसांचं समन्स, पूजा म्हणते, ‘माझी तब्येत बरोबर नाही, नंतर येते!’

टीम लय भारी

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानीला मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) समन्स बजावले आहे. मुंबई पोलीस किरण गोसावी खंडणी प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत पूजा ददलानीने मुंबई पोलिसांकडे आणखी वेळ मागितला आहे. पूजा ददलानी शाहरुख खानची मॅनेजर आहे (Mumbai Police summons Pooja Dadlani).

हॅकर मनीष भंगाळेचे दावे आणि गौप्यस्फोट

यापूर्वी, एका सायबर तज्ञाने आणि हॅकरने दावा केला होता की, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) काढण्यासाठी पूजा ददलानीसह काही लोकांच्या व्हॉट्सअॅप चॅट्स एडिट करण्यासाठी दोन लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. मनीष भंगाळे असे या हॅकरचे नाव आहे. दाखवलेल्या व्हॉट्सअॅप चॅटची बॅकअप फाइल आर्यन खानच्या नावावर असल्याचा दावा भंगाळे यांनी केला होता.

माधुरी दीक्षितच्या मुलाने केस दान करत दाखविली उदारता, माधुरीने शेअर केला व्हिडिओ

‘बिग बॉस चा घरातून बाहेर पडताच तृप्ती देसाईंनी केली मोठी घोषणा

प्रभाकर साईलच्या नावाने बनावट सिमकार्ड बनविण्यास सांगितले होते, असा मोठा दावा हॅकर मनीष बंगाळेने केला होता. जळगावात 6 ऑक्टोबरला आलोक जैन आणि शैलेश चौधरी नावाच्या दोघांनी माझ्याशी संपर्क साधला होता. यासाठी मला पाच लाख रुपयांची ऑफरही देण्यात आली होती तसंच जबरदस्तीने 10 हजार रुपयेही देण्यात आले होते, असे दावे भंगाळेंनी केले होते.

मनीष भंगाळेंचं अमित शहा, वळसे पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र

“कधीही आवाज द्या,मी साथ देईन,” म्हणत हिंदुस्थानी भाऊ आले मोहित कंबोज यांच्या मदतीला

Shah Rukh Khan’s manager Pooja Dadlani summoned by the Mumbai Police in extortion probe

गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये प्रभाकर साईलबद्दलच्या बातम्या येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनीष भंगाळे यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. मनीष भंगाळे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसंच महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना पत्र लिहिले आहे.

भंगाळे म्हणाले, आलोक जैन आणि शैलेश चौधरी नावाच्या या दोघांनी मला सांगितले की, तू भारतातील प्रसिद्ध हॅकर आहेस. तुमच्याकडे आमचं एक विशेष काम आहे. त्यांनी मला काही नंबर दिले आणि सांगितले की आम्हाला त्यांचा सीडीआर हवा आहे. त्या सर्व क्रमांकांपैकी एक नंबर पूजा ददलानी या नावाने सेव्ह करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी मला व्हॉट्सअ‍ॅप चॅटची बॅकअप फाईल दाखवली आणि त्या फाईल्स एडिट करण्यास सांगितल्या. त्यानंतर त्यांनी मला एक मोबाइल नंबर दिला आणि या नंबरवर कॉल करण्यास सांगितलं आणि जेव्हा मी तो नंबर ट्रूकॉलरवर पाहिला तेव्हा हा नंबर काही सॅमचा होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी