31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeमुंबईAaditya Thackeray : आदित्य ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव

टीम लय भारी

मुंबई : पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एका ७ दिवसांच्या बाळाचे प्राण वैद्यकीय मदत करून वाचवले होते. तर आता एका रस्त्यावर राहणा-या थंडी-तापाने फणफणणाऱ्या रुग्णाला मदत केल्यामुळे आदित्य ठाकरेंवर आता कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

मुंबईसारख्या शहरात ज्यांना राहायला घरच नाही अशा रस्त्यावर, फूटपाथवर राहणाऱ्या लोकांच्या समस्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही. मंत्री आदित्य ठाकरे यांनी अशाच एका रस्त्यावर राहणाऱ्या थंडी-तापानं फणफणणाऱ्या रुग्णाला मदत केली आहे.

अंधेरीतल्या आझाद नगर मेट्रो स्टेशनजवळ दीड महिन्यापासून पायाला गँगरीन आणि थंडी-ताप अशा अवस्थेत एक रुग्ण पडून होता. या रुग्णांची माहिती एका नागरिकानं ट्विट करुन मंत्री आदित्य ठाकरे यांना दिली होती. यानंतर आदित्य ठाकरे यांनी याची दखल घेत तत्परता दाखवत अवघ्या २० मिनिटात त्या रुग्णासाठी रुग्णवाहिकेची सोय केली. त्यामुळे या रुग्णाचे प्राण वाचले आहेत.

जयदेव पांचाळ असे या व्यक्तीचे नाव आहे. एका नागरिकाने ट्विट केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तत्काळ या ट्विटची दखल आपले सहकारी राहुल कनाल यांना मदत करण्यास सांगितले. अवघ्या २० मिनिटात राहुल कनाल आणि युवासेनेच्या टीमनं रुग्णवाहिका आणून या रुग्णाला मदत केली.

युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी या रुग्णाला तात्काळ उपचार करण्यासाठी अंधेरीच्या कूपर रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी रुग्णावर तातडीनं उपचार सुरु केले. डॉक्टरांच्या सूचनेनुसार ब्लड रिपोर्ट, सोनोग्राफी, युरिन आणि शुगर टेस्ट करण्यात आली. यानंतर लगेचच रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळे या रुग्णांचा जीव वाचला.

त्याआधी मंत्री आदित्य ठाकरे यांनी जन्मतःच हृदयात तीन ब्लॉक असलेल्या सहा दिवसांच्या अर्भकाला मदतीचा हात दिला. मंत्री आदित्य ठाकरे यांनी नवजात बाळाच्या पित्याकडे एक लाख रुपयांची मदत सुपूर्द केली. आदित्य ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसाला खर्च टाळून गरजूंना मदत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते.

घणसोलीमध्ये राहणाऱ्या अब्दुल अंसारी यांच्या नवजात बाळाच्या हृदयात जन्मतःच तीन ब्लॉकेज होते. मुलुंडमधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सहा दिवसाच्या अर्भकाची जीवन-मृत्यूशी झुंज सुरु आहे.

बाळाच्या हृदयात 3 ब्लॉकेज आणि एक छिद्र होते. ऐरोलीच्या मनपा रुग्णालयात जन्माला आलेल्या बाळाच्या जीवाला जन्मापासूनच धोका असल्याचं सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं. त्याला नेरुळच्या मंगल प्रभू रुग्णालयात पाठवण्यात आलं. त्याच्या प्रकृतीत काही सुधारणा न झाल्याने अब्दुल आपल्या मुलाला मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात घेऊन आला.

बाळाच्या वडिलांकडे उपचार करुन घेण्यासाठी पैसे नव्हते. त्रस्त पित्याने अनेकांकडे मदतीची याचना केली. युवासेना कार्यकर्त्याला याविषयी माहिती मिळाल्याने त्याने पित्याची व्यथा आदित्य ठाकरेंपर्यंत पोहोचवली.

आदित्य ठाकरे यांनी राहुल कनल आणि हुसैन शाह या कार्यकर्त्याच्या माध्यमातून अब्दुल अंसारी यांच्याकडे एक लाखाची मदत सुपूर्द केली. इतकंच नाही, तर यापुढे येणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याचं आश्वासनही दिलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून पित्याने आदित्य ठाकरे यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी