36 C
Mumbai
Monday, November 13, 2023
घरमुंबईआदित्य ठाकरेंच्या ट्विटचा सरकारने घेतला धसका !

आदित्य ठाकरेंच्या ट्विटचा सरकारने घेतला धसका !

शिवसेना (उबाठा) गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दावा केला आहे की, त्यांनी लक्षात आणून दिलेल्या दोन बाबींवर सरकारने आणि मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल (BMC Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका (BMC) कर्मचारी व बेस्ट (BEST) कर्मचारी यांना लवकर दिवाळी बोनस देण्यासाठी तसेच मुंबई महापालिकेतील कथित रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदाराला बडतर्फ करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विटला गांभीर्याने घेत सरकारने त्वरित कारवाई केली आहे. आदित्य यांनी यासाठी सरकारला 24 तासांचा अवधि दिला होता, पण 24 तासांच्या आताच दोन्ही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे, आदित्य ठाकरे यांच्या ट्विटचा सरकारने धसका घेतला की काय? असा प्रश्न पडला आहे.

आदित्य ठाकरे यांनी बुधवारी, (8 नोव्हेंबर) आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरुन (पूर्वीचे ट्विटर) ट्विट करत मुंबई महापालिका प्रशासक इकबाल सिंग चंहल यांना दोन प्रश्न विचारले होते. मुंबई महापालिका कर्मचारी आणि बेस्ट कर्मचारी यांना दिवाळी बोनस मिळाला नसून तो कधी मिळणार? असा सवाल त्यांनी केला होता. तसेच, कथित बीएमसी रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदाराला बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली होती. यासाठी त्यांनी 24 तासांचा अवधि दिला होता. यावर, राज्य सरकारने बुधवारी बीएमसी आणि बेस्ट कर्मचारी यांना बोनस जाहीर केला. तसेच, मुंबई महापालिका आयुक्तांनीही रस्ते कंत्रातदाराला बडतर्फ करण्याच्या फाइलवर सही केली आहे. त्यामुळे, हे दोन्ही निर्णय आपल्याच ट्विटचा परिणाम असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.


मुंबई महापालिका कर्मचारी आणि बेस्ट कर्मचारी यांना दिवाळी बोनस मिळाल्यावर आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन सांगितले, “आपल्या मुंबई शहरासाठी अथक परिश्रम करणाऱ्या मुंबई महानगरपालिका आणि BEST च्या कामगारांसाठी खोके सरकारला आज तातडीने बैठक बोलावून घाईघाईने बोनस जाहीर करावा लागला. खोके सरकार हे विसरले होते, परंतु ज्या BMC कर्मचाऱ्यांनी हे माझ्या लक्षात आणून दिले आणि मला हा विषय घेण्यास सांगितले त्या सर्वांचा मी आभारी आहे. आता हा बोनस खरंच खात्यात जमा होणार की नाही हे पहावं लागेल, कारण मिंधे- भाजप सरकारवर जनतेचा शून्य विश्वास आहे. आता दिवाळीची आमची एक मागणी 24 तासांत (प्रत्यक्षात 12 तासांतच) पूर्ण झाल्यावर, दुसरी मागणीही महापालिका आयुक्त तत्काळ पूर्ण करतात का ते पाहूया. काम न केल्याबद्दल रोड कंत्राटदाराला बाद करणार का?? की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे रस्ते मेगा घोटाळ्यातील मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदार मित्राला दिवाळी बोनस द्यायला भाग पडणार?”


त्यानंतर, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी रस्ते कंत्राटदाराला निलंबित केल्यावरही आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले. ते म्हणाले, “मेगा रोड घोटाळ्यातील एका कंत्राटदाराला अखेर नारळ! जानेवारी 2023 पासून, मी दर महिन्याला, मुंबई महापालिका प्रशासकाच्या माध्यमातून मुंबईवर थेट नियंत्रण मिळवलेल्या ‘मिंधे-भाजप’ राजवटीत मुंबईला सर्व बाजूंनी लुटण्याची कशी योजना आखली गेली आहे ह्याबद्दल सातत्याने आवाज उठवत आहे. रस्ता घोटाळा ₹6080 कोटींचा आहे, ज्यातून हा निधी त्यांच्याच कंत्राटदार मित्रांच्या झोळीत टाकण्याचा कट सुरु होता.”


“शेवटी, काल माझ्या ट्विटनंतर, आयुक्तांनी दक्षिण मुंबई रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदाराचा करार संपुष्टात आणण्यासाठी फाइलवर स्वाक्षरी केली आहे… ज्याच्याकडे ₹1687 कोटींची कामे होती, पण काम मात्र सुरूच झाले नव्हते. फाईल आयुक्तांच्या डेस्कवर पडून होती आणि त्यावर स्वाक्षरी न करण्याचा जबरदस्त दबाव वरुन असावा हे स्पष्ट दिसत होतं.”

हे ही वाचा 

बीएमसी, बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस कधी? आदित्य ठाकरेंचा महापालिका आयुक्तांना प्रश्न

प्रदूषणमुक्त वातावरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या मौलिक सूचना, काय म्हणाले मुख्यमंत्री

मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी पुन्हा महाराष्ट्र दौरा !

“गेल्या 11 महिन्यात, दर महिन्याला सातत्याने मुंबईकरांची लूट करणार्‍या ह्या मेगा रोड घोटाळ्यातील BMC आणि खोके सरकारचा आम्ही पर्दाफाश करत आलो.आणि आज शेवटी हे सिद्ध झालंच! आमच्या ट्विट आणि पूर्वीच्या पत्रकार परिषदांनी हे सुनिश्चित केलं, की मुंबई आयुक्त बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदार मित्रासोबत समझोता करण्यात काहीही मदत करू शकणार नाहीत. आणि आता जेव्हा आमचा हा मुद्दा रास्त ठरला आहे, तेव्हा बाकीच्या कामांबद्दलही आम्हाला आणखी बरेच प्रश्न आहेत… ज्याची उत्तरं आम्ही मिळवणारच!”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी