31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
HomeमुंबईSharad Pawar : शरद पवारांबरोबर अशिष शेलारांनी मारल्या दिलखुलास गप्पा

Sharad Pawar : शरद पवारांबरोबर अशिष शेलारांनी मारल्या दिलखुलास गप्पा

नेहमी शरद पवारांवर (Sharad Pawar) परखपणे टीका करणारे अश‍िष शेलार आज शरद पवारांच्या जवळ बसलेले दिसले. त्यांनी एकमेंकांशी दिलखुलास गप्पा मारल्या.

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक जवळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर नेते मंडळींच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. दोन विरोधी पक्षातले नेते एकमेकांच्या जवळ बसतात. त्यावेळी अपसूकच भूवया उंचावल्या जातात. तशीच घटना आज घडली आहे. नेहमी शरद पवारांवर (Sharad Pawar) परखपणे टीका करणारे अश‍िष शेलार आज शरद पवारांच्या जवळ बसलेले दिसले. त्यांनी एकमेंकांशी दिलखुलास गप्पा मारल्या. माध्यामांनी देखील त्यांची छबी टीपण्यासाठी नेहमी प्रमाणे धडपड केली. नेते भाषण करतांना एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडत असले, एकमेकांची उणी दुणी काढत असले तरी त्यांच्यात सलोखा असतो. ते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसतात. त्यांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात हेच खरे आहे.

हे सुद्धा वाचा

Garba Song : गरब्यासाठी फाल्गुनी पाठक यांचे नवे गाणे रिलीज

Indian independence : स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी नंतरही स्वातंत्र्य सैनिकांना हक्कांसाठी लढावे लागतेय

T-20 : भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचे तीन दिग्गज खेळाडू संघाबाहेर

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकाजवळ आल्या आहेत. त्यामुळे भाजपचे मुंबई अध्यक्ष अशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या निवास्थानी ही भेट झाली. मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. एमसीए वर गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार हे अध्यक्ष आहेत. अध्यक्ष निवडी बाबत मोठे नेते त्यांची भेट घेत आहेत. यापूर्वी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील त्यांची भेट घेतली होती.

आशा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचे नेते एकमेकांना मदत करत असतात. एमसीएच्या अध्यपदाच्या निवडुकीमध्ये अनेक दिग्गज नेते रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. संदीप पाटील यांनी देखील ही इच्छा व्यक्त केली आहे. 1983 च्या विश्वचषकामध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. ते शरद पवार यांचे समर्थक मानले जातात. तर विजय पाटील, अमोल काळे, मिलिंद नार्वेकर आणि नवीन शेट्टी हे देखील रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी