34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रIndian independence : स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी नंतरही स्वातंत्र्य सैनिकांना हक्कांसाठी लढावे लागतेय

Indian independence : स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी नंतरही स्वातंत्र्य सैनिकांना हक्कांसाठी लढावे लागतेय

(Indian independence) महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैन‍िक तक्रार निवारण समितीचे पदाधिकारी व पाल्य विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे उपोषणाला बसले आहेत.

भारताला स्वातंत्र्य (Indian independence) मिळून 75 वर्षे झाली. परंतु स्वातंत्र्य सैन‍िकांना अजून सन्मानाची वागणूक मिळत नाही. त्यांना पुरेसे मानधन दिले जात नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैन‍िक तक्रार निवारण समितीचे पदाधिकारी व पाल्य विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे उपोषणाला बसले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी त्यांची भेट घेतली. तुमच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करु असे आश्वासन त्यांनी यावेळी अंदोलकांना दिले. या अंदोलनामध्ये स्वातंत्र्य सैन‍िक आणि त्यांचे पाल्य उपस्थित होते.

स्वातंत्र्य सैनिकांच्या मागण्या मान्य न केल्यास सरकामध्ये बसलेले नेते समाधानी राहू शकत नाहीत. मी या मागण्यांचा सरकारने पाठ पुरावा करेन, तुम्हाला न्याय मिळून देईल. आपल्या मागण्यांचा विचार करायला वेळ लागू शकतो. परंतु जे स्वातंत्र्यासाठी लढले त्यांचा किमान सन्मान तरी करा, असे मत अंबादास दानवे यांनी यावेळी व्यक्त केले. एखादी मागणी मान्य होईल न होईल परंतु अमानजनक वागू नका. इतका वेळ उन्हात बसून देखील या लोकांची सरकार मधील एकही मंत्री दखल घेत नाही. हे सर्व जण मुंबई बाहेरचे आहेत. ते न्याय मागण्यासाठी आले आहेत. परंतु त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यांची दखल घेत नाही,असे अंबादास दानवे यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Aryan Khan : आर्यन खाने स्वत:ला सावरले, सोशल मीडियावर झाला सक्रीय

T-20 : भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचे तीन दिग्गज खेळाडू संघाबाहेर

Free Treatment for Patients: मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने मोफत आरोग्य सेवा !

हैद्राबाद मुक्ती संग्रामाला देखील 75 वर्षे पुर्ण होतील. परंतु त्या लढयात सहभागी झालेल्यांना देखील सरकार विचारत नाही. स्वातंत्र्य संग्रामामध्ये पायाला गोळी लागले एक जण देखील यावेळी आंदोलनाला उपस्थित होते. आशा प्रकारे आंदोलन कर्त्यांच्या भावना समजून घेत अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला. आपण या गोष्टींंचा पाठपुरावा करणार असल्याचे वचन त्यांनी यावेळी दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी