33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeक्रीडाT-20 : भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचे तीन दिग्गज खेळाडू संघाबाहेर

T-20 : भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचे तीन दिग्गज खेळाडू संघाबाहेर

टी -20 (T-20) मॅच खेळण्यास भारतात येण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू टीमधून बाहेर पडले आहेत. ते जखमी झाल्यामुळे त्यांनी विश्रांती घेतली आहे.

कोरोना महामारीमुळे दोन वर्षे जगभरात कोणताही खेळाचा समाना झाला नाही. मात्र या वर्षी सगळीकडे क्रिक्रेटच्या मॅच सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंचा उत्साह देखील वाढला आहे. मात्र टी -20 (T-20) मॅच खेळण्यास भारतात येण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू टीमधून बाहेर पडले आहेत. ते जखमी झाल्यामुळे त्यांनी विश्रांती घेतली आहे. भारतामध्ये टी-20 सामन्याची 20 सप्टेंबरला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाड अशी ओळख असलेला डेव‍िड वॉर्नर आगोदरच संघातून बाहेर पडला आहे. त्याच्या पाठोपाठ आता आणखी तीन खेळाडू संघातून बाहेर पडणार आहेत. त्यामध्ये जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क, मिचेल मार्श आणि मार्कस स्टोइनिस यांचा समावेश आहे.

त्यांच्या जागेवर नाथन एलिस, डेनियल सॅम्स आणि सीन एबॉट हे खेळणार आहेत. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. भारतामध्ये तीन वेगवेगळया शहरांमध्ये सहा दिवस हा सामना रंगाणार आहे. आगामी टी-20 वर्ल्डकप वर देखील ऑस्ट्रेलियाने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे या बलाढय खेळाडूंना विश्रांती घेण्याची संधी दिली आहे. ऑस्ट्रेलिया 22 ऑक्टोबरला न्युझीलँड विरुध्द हा सामना खेळणार आहे.

हे सुद्धा वाचा

Goa Congress : गोव्यातील काँग्रेसच्या आठ आमदारांनी शपथ मोडली

Aryan Khan : आर्यन खाने स्वत:ला सावरले, सोशल मीडियावर झाला सक्रीय

Good Health : निरामय आरोग्यासाठी ‘लिंबू’ खाणे हितकारक

मार्श आणि स्टोइनिस हे झिंब्बावे आणि न्युझीलँडच्या सामन्या दरम्यान जखमी झाले आहेत. तर स्टार्क याला सिडनीमध्ये गुडघ्याला दुखापत झाली आहे. मार्कस स्टोइनिस याच्या अनुपस्थितीमध्ये डेव‍िड याला चांगले खेळण्याची संधी मिळणार आहे. या संघात मार्शल नसल्यामुळे काही बदल करावा लागणार आहे.

स्मिथ 3 नंबरवर खेळू शकतो. या मॅचमध्ये कॅमरॉन ग्रीन याला देखील मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. आरोन फिंच याच्या बरोबर जोश देखील सुरूवात करु शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जगभरातले क्रिडाप्रेमी हा सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच भारतात कोणत्या मैदानामध्ये हा खेळ रंगणार आहे याची देखील उत्सुकता सर्वांना लागली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी