31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईमध्य रेल्वेचा ६६वा वार्षिक रेल्वे पुरस्कार समारोह संपन्न

मध्य रेल्वेचा ६६वा वार्षिक रेल्वे पुरस्कार समारोह संपन्न

संदिप रणपिसे : टीम लय भारी

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथील मध्य रेल्वे सभागृहात आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी वर्ष २०२-२१ मध्ये  १३२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट आणि अनुकरणीय कार्यासाठी वार्षिक पुरस्कार प्रदान केले (Central Railway’s 66th Annual Railway Awards Ceremony).

कोविड प्रोटोकॉलमुळे फक्त मुख्यालय, मुंबई विभाग आणि मुंबई विभागाच्या अख्यारीतील कार्यशाळा/युनिट्स मधील पुरस्कार प्राप्त करणारे उपस्थित होते. महाव्यवस्थापकांनी विभागीय, कार्यशाळा, रेल्वे स्थानकांना आंतर-विभागीय कार्यक्षमता ढाल दिली. वैद्यकीय विभागातील २४ पुरस्कारप्राप्त होते.

बीकेसी पूल दुर्घटनेतील अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करा : अनिल गलगली

रोहित पवारांनी भारताच्या संरक्षण क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला

भुसावळ विभागाला ४ शिल्ड ज्यामध्ये  गौरवशाली ओव्हरऑल इफीशीएंसी शिल्ड, परीचालन, वाणिज्य, कार्मिक शील्ड तसेच वर्क एफिशियन्सी शील्ड आणि स्टोअर्स एफिशिएन्सी शील्ड यांनी नागपूर विभागासह संयुक्तपणे जिंकली. एस. एस. केडिया, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ विभाग यांनी  संबंधित विभागाच्या शाखा अधिकाऱ्यांसह शील्ड स्विकारली.

मुंबई विभागाने  इलेक्ट्रिकल, अकाउंट्स, सुरक्षा आणि वक्तशीरता शील्ड सोलापूर विभागासह संयुक्तपणे तसेच अभियांत्रिकी शील्ड नागपूर विभागासह संयुक्तपणे जिंकली.  मुंबई विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला स्वच्छतेसाठी सर्वोत्तम स्थानकासाठीचे (A1, A आणि B श्रेणी स्थानकांखाली) शिल्ड प्राप्त झाले.  सांगली रेल्वे स्टेशनला  सर्वोत्तम राखलेली बाग आणि कार्यशाळा कार्यक्षमता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) शील्ड माटुंगा वर्कशॉपने जिंकला.  सर्वोत्कृष्ट निर्माण युनिट शील्ड उपमुख्य अभियंता नागपूर यांनी सर्वोत्कृष्ट  स्वच्छता विभाग शील्ड सोलापूर विभागाने जिंकला.

मुख्यमंत्री महोदय तुम्ही माझ्या पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो : रावसाहेब दानवे

Central Railway clears 1.7 lakh cubic metres of garbage from tracks in 2020-21

अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक बी. के. दादाभोय, अतिरिक्त महाव्यवस्थापक डॉ. ए.के.  सिन्हा, प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी, विभागांचे प्रधान मुख्य अधिकारी आणि शिल्ड मिळणाऱ्या विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी उपस्थितांना संबोधित करताना महामारीच्या वर्षात मध्य रेल्वेच्या यशाबद्दल सविस्तर सांगितले.  त्यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. त्यांनी हेही नमूद केले की, सर्व विभाग प्रमुख आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली एक मजबूत कार्यबल मध्य रेल्वेत असल्याचा त्यांना अभिमान आहे. कामगार संघटनांनी दिलेल्या सहकार्याचेही त्यांनी कौतुक केले. तत्पूर्वी, डॉ.ए.के. सिन्हा, प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

मध्य रेल्वेचे सर्व प्रधान विभाग प्रमुख, विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि  इतर अधिकारी, मीनू लाहोटी, अध्यक्षा, मध्य रेल्वे महिला कल्याण संघटना  आणि कार्यकारी समिती सदस्य, मान्यताप्राप्त युनियन प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी