33 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeमुंबईमध्य रेल्वेने "फक्त एक पृथ्वी" संकल्पनेनुसार जागतिक पर्यावरण दिन २०२२ साजरा केला

मध्य रेल्वेने “फक्त एक पृथ्वी” संकल्पनेनुसार जागतिक पर्यावरण दिन २०२२ साजरा केला

टीम लय भारी

मुंबई : युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम च्या अनुषंगाने मध्य रेल्वेत जागतिक पर्यावरण (World Environment Day) दिन २०२२ साजरा करण्यात आला, या वर्षीच्या “केवळ एक पृथ्वी” या थीमवर लक्ष केंद्रित करणारे उपक्रम सुरू करण्यात आले.(World Environment Day was celebrated by Central Railway)

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी २०० किलोलिटर डेली सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पायाभरणी नवीन कोचिंग कॉम्प्लेक्स, वाडीबंदर, मुंबई येथे केली. श्री ए.के. गुप्ता, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता; शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग आणि इतर विभागांचे प्रमुख, विभागीय (World Environment Day) शाखा अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था चे वरिष्ठ प्रधान शास्त्रज्ञ डॉ. राजेश बिनीवाले हे देखील उपस्थित होते आणि त्यांनी पर्यावरणीय शाश्वततेमध्ये या (World Environment Day) सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे महत्त्व स्पष्ट केले.

अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, लाखो प्रवासी आणि वाहतूक उपक्रम हाताळणाऱ्या रेल्वेसारख्या विशाल वाहतूक संस्थेसाठी कचरा व्यवस्थापन हा महत्त्वाचा विषय आहे. मध्य रेल्वेने (World Environment Day) अन्न, भाजीपाला आणि फळांच्या कचऱ्याचे चांगल्या कंपोस्टमध्ये रूपांतर करण्यासाठी भुसावळ आणि लोणावळा स्टेशन, पुणे येथील रेल्वे कॉलनी आणि माटुंगा वर्कशॉप येथील बागांमध्ये वापरण्यासाठी कंपोस्ट बिन आणि कंपोस्ट टंबलर प्लांट बसवले आहेत.

मध्य रेल्वेने "फक्त एक पृथ्वी" संकल्पनेनुसार जागतिक पर्यावरण दिन २०२२ साजरा केला

प्लॅस्टिकच्या धोक्याचा सामना करण्यासाठी ३७ स्थानकांवर ४८ प्लास्टिक बाटली क्रशिंग मशीन (World Environment Day) बसविले आहेत. मध्य रेल्वेतील ट्रेनच्या सर्व डब्यांमध्ये १००% बायो-टॉयलेट बसवलेले आहेत जे ताजे आणि निरोगी वातावरण राखण्यात मदत करतात. आपण अधिकाधिक स्थानकांना IGBC मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ज्यामुळे केवळ खर्चच नाही तर पर्यावरणाचे रक्षण होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी