मुंबई

मुंबई महापालिकेतील औषध खरेदीची चौकशी होणार; एकनाथ शिंदे यांची घोषणा

आज विधानसभेत भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेत औषध खरेदी चुकीच्या पद्धतीने झाली असून त्याची चौकशी करणार का असा सवाल उपस्थित केला. शेलार यांच्या प्रश्नावर मुंबई महापालिकेत (BMC) यापुर्वीच्या काळात औषध खरेदीत चूकीच्या बाबी घडल्या आहेत. तसेच औषध दिरंगाई झाली या सगळ्याची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत केली.

मुंबई कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण महापालिका रुग्णालयातील सोई सुविधांचा अभाव असल्याकडे लक्ष वेधीत भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता. यावर बोलताना आमदार अँड आशिष शेलार यांनी या रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरणार का? चुकीची औषध खरेदी व औषध दिरंगाई झाली त्याची चौकशी करणार का? असे प्रश्न उपस्थितीत केले.

हे सुद्धा वाचा

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक मिनीटही खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही’

मोदी-शाहांचे खासमखास, गुजरात दणदणीत जिंकवून देणाऱ्या सीआर पाटील यांच्या लेकीच्या पॅनलचा गावच्या निवडणुकीत पराभव

आम्ही मनोहर जोशी, नारायण राणे, फडणवीसांचे देखील सरकार बघितले; अजित पवार विधीमंडळात संतापले

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे मान्य करुन, रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील अशी ग्वाही दिली. तसेच आमदार अँड आशिष शेलार यांनी केलेल्या सूचने प्रमाणे 5000 स्वच्छता दूत जसे नियुक्त करण्यात येणार आहेत त्याच प्रमाणे 5500 आशा वर्कर्सची भरती करण्यात येईल अशी घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली. या रुग्णालयाबाबतीत सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली तीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.
दरम्यान, पश्चिम उपनगरातील सेव्हन हिल्स रुग्णालय महापालिकेने ताब्यात घ्यावे अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. ती मान्य करीत याबाबत महापालिकेला सूचना करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या चर्चेत आमदार पराग आळवणी, योगेश सागर सहभागी झाले.

 

प्रदीप माळी

Recent Posts

संकटग्रस्त अजित पवारांना हवाय मनोज जरांगे पाटलांचा आधार

अजितदादांचे धाकटे सुपूत्र जय पवार थेट मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले. जय यांनी हेलिकॉप्टर…

4 mins ago

उन्हाचा तडाखा वाढला मात्र शहरात स्वाईन फ्लू नियंत्रणात

एप्रिल महिन्यामध्ये उन्हाचा तडाखा (Heat wave intensifies) मोठा होता त्यात शेवटच्या आठवड्यात पारा ४३ अंशावर…

6 mins ago

हेमंत करकरेंना लागलेली गोळी दहशतवाद्याच्या,उज्ज्वल निकमांनी…”; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचार  सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत.…

26 mins ago

विजय करंजकर आहेत ‘एवढ्या’ कोटींचे मालक

सध्या देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे  वारे वाहत असून सगळीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी…

41 mins ago

दिंडोरी लोकसभेतून माकपचे जे पी गावित घेणार माघार

दिंडोरी लोकसभा मतदार संघात सीपीएमचे उमेदवार जे. पी. गावित (J P Gavit) यांनी अपक्ष म्हणून…

1 hour ago

नातवाने केली घरातच चोरी; शौक भागविण्यासाठी आजीचे दागिने लांबविले

म्हसरुळ पाेलीसांच्या हद्दीत दाेन महिन्यांपूर्वी घडलेल्या एका क्लिष्ट चाेरीचा गुन्हा उघड करण्यात पाेलीसांना यश आले…

1 hour ago