31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमुंबईhospital : संभाजीनगरमधील शासकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयाच्या विस्तारास मंत्रीमंडळाची मान्यता, २६५...

hospital : संभाजीनगरमधील शासकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयाच्या विस्तारास मंत्रीमंडळाची मान्यता, २६५ खाटांची सोय होणार

टीम लय भारी

मुंबई : संभाजीनगर येथील कर्करोग रुग्णालयाच्या (hospital) विस्तारीकरणास आज मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे १०० खाटांच्या रुग्णालयाचे २६५ खाटांमध्ये विस्तारिकरण केले जाणार आहे. यासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली.

याबाबत पालकमंत्री श्री. सुभाष देसाई यांनी वारंवार पाठपुरावा केला व आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या समवेत बैठका घेऊन हा प्रश्न मार्गी लावला आहे.

संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयास शासन निर्णय १५.१०.२०१६ नुसार राज्य कर्करोग संस्था म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या १०० खाटांच्या रुग्णालयाचे विस्तारीकरण होऊन २५६ खाटांची सोय होणार आहे. यामुळे आता मराठवाड्यातील कर्करोग रुग्णांना संभाजीनगरमध्येच उपचार मिळणार आहेत .

विस्तारित रुग्णालयासाठी गट-अ ते गट-ड ची ३१६ नियमित पदे व ४४ बाह्य पदे अशी ३६० पदे भरली जाणार आहेत. यासाठी २४ कोटी ६४ लाख २४ हजार ७८८ रुपये वार्षिक खर्च येणार आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी