31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रऔरंगाबादेत कथित कोरोना रुग्णांचा सुळसुळाट, सहा आरोपींवर गुन्हा दाखल

औरंगाबादेत कथित कोरोना रुग्णांचा सुळसुळाट, सहा आरोपींवर गुन्हा दाखल

टीम लय भारी

औरंगाबाद मध्ये सध्या खऱ्या कोविड रुग्णांच्या जागी खोटे रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याचं प्रकरण सध्या गाजत आहे. या सगळ्या प्रकरणावरून औरंगाबाद मध्ये एकच गोंधळ उडाला आहे(Alleged corona patients in Aurangabad)

ह्या सगळ्या गोंधळानंतर महानगरपालिकेच्या तक्रारीनंतर सहा लोकांवर सिडको पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Corona Vaccination in India: भारताचा नवा विक्रम! १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार

Coronavirus Vaccine : SII ला सरकारकडून मिळाली 1.10 कोटी ‘कोविशिल्ड’ची ऑर्डर, पुण्यातून पहिली बॅच झाली ‘डिस्पॅच’

कोरोना पॉझिटिव्ह असलेले दोन रुग्ण, त्यांच्या जागेवर उपचार घेणारे दोन रुग्ण आणि या प्रकरणासाठी मध्यस्थी करणारे दोन लोकं अशा सहा लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

दहा दिवसाचे दहा हजार रुपये मिळणार शिवाय तसेच खा-पिया आणि मजा करा असे त्या मध्यस्थी करणाऱ्या माणसाने खोट्या रुग्णांना सांगितले आणि ते दोघेही हे करण्यासाठी तयार झाले. यासाठी ते दोघे जालन्याहून उपचार घेण्यासाठी ते औरंगाबाद मध्ये आले आणि चक्क पॉझिटिव्ह रुग्णांसोबत उपचार घेऊ लागले. हळू हळू ही बाब आरोग्य अधिकाऱ्याच्या लक्षात आली.

corona vaccine : महाराष्ट्रासाठी उद्याचा दिवस ठरणार अत्यंत महत्त्वाचा!

Cover Corona Outbreak Impact: U.S. Pulse and Regional Oximeters Market is expected to Boom in Coming Years

रुग्णालयाने ह्या बाबतची तक्रार पोलीस ठाण्यात केली आणि त्यानंतर पोलिसांनी सहा जणांना आपल्या ताब्यात घेतले. या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी चौकशी केल्यानंतर असे लक्षात आले की खरे पॉझिटिव्ह रुग्ण आणि बनावट पॉझिटिव्ह रुग्ण यांच्यात दोन मध्यस्थ आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी