30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईजनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष : जिल्हाधिकारी...

जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष : जिल्हाधिकारी निधी चौधरी

मुंबई उपनगर जिल्ह्यातील जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावरील कामे. त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ स्वीकारण्याकरीता तसेच प्रशासकीय कारभार लोकाभिमुख व्हावा यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात (Mumbai Suburban Collectorate) मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (Chief Minister’s Secretariat Room) स्थापन केल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी(IAS Nidhi Chaudhary) मंगळवारी (दि.७) रोजी दिली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी चौधरी बोलत होत्या. (IAS Nidhi Chaudhary Said Establishment of Chief Minister’s Secretariat Room at Mumbai Suburban Collectorate)

जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या की, नागरिकांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी, तसेच प्रशासनात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच नागिकांनी आपल्या अडीअडणींचे अर्ज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे दहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात सादर करावेत. या कक्षामध्ये प्राप्त होणाऱ्या अर्जांचा आढावा आणि कार्यवाही संदर्भात जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आढावा घेण्यात येईल. नागरिकांनी ऑनलाईन सेवांचा लाभ घ्यावा. इतर विभागांच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारी संदर्भात ही कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी चौधरी म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन

सोशल मीडियावरील अधंभक्तांचे तळवे चाटणाऱ्या मीडियातील काही व्यक्तींपासून सावध राहण्यातच देशहित: खासदार अमोल कोल्हे

बेळगावमध्ये होणार पहिले बालनाट्य संमेलन; सुबोध भावे, सई लोकूर यांची खास उपस्थिती!

मुख्यमंत्री सचिवालय कक्षामध्ये सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्री महोदयांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ स्वीकारुन (अर्धन्यायिक आणि न्यायिक कामकाजाची प्रकरणे वगळून) ही प्रकरणे जिल्हास्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे, अशी प्रकरणे जिल्हास्तरावरील विभाग प्रमुखाकडे वर्ग करुन तातडीने कार्यवाही करण्यात येईल. तसेच ज्या प्रकरणी शासन स्तरावरून कार्यवाही होणे अपेक्षित आहे, यामध्ये सर्व वैयक्तिक तसेच धोरणात्मक अर्ज, संदर्भ व निवेदने मुख्य सचिव, मुख्यमंत्री सचिवालय यांना सादर करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी