34 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रबेळगावमध्ये होणार पहिले बालनाट्य संमेलन; सुबोध भावे, सई लोकूर यांची खास उपस्थिती!

बेळगावमध्ये होणार पहिले बालनाट्य संमेलन; सुबोध भावे, सई लोकूर यांची खास उपस्थिती!

बेळगावच्या मुलांमध्ये अभिनयाची आवड निर्माण व्हावी, आत्मविश्वास वाढावा, त्यांच्यामध्ये सभाधिटपणा यावा या उद्देशाने ‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ या संस्थेतर्फे १८ आणि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी बेळगावच्या ‘संत मीरा हायस्कूल’मध्ये ‘पहिल्या बालनाट्य संमेलनाचे’ (First Balnatya Sammelan) आयोजन करण्यात आले आहे. ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव’ आणि ‘फुलोरा बेळगाव’ या संस्थांचे सहकार्य संमेलनाला लाभले आहे. या संमेलनाला प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave), अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur), अभिनेते प्रसाद पंडित, संमेलनाध्यक्षा माननीय मीना नाईक यांसह अनेक दिग्गज उपस्थित राहणार असल्याचे बालरंगभूमी अभियान, मुंबईच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनी सांगितले. (First Balnatya Sammelan held in Belgaum; Special appearance of Subodh Bhave, Sai Lokur!)

शनिवार १८ फेब्रुवारी रोजी दुपारी नाट्यदिंडीने संमेलनाचे उद्घाटन करण्यात येईल. उद्घाटन समारंभ संपन्न झाला की बेळगावच्या कलाकारांचा सहभाग असलेली दोन बालनाट्य शिबिरार्थींसाठी सादर करण्यात येतील. रविवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत बालरंगभूमी अभियानसाठी काम करणारे, मुंबई–पुण्यातील तज्ज्ञ मंडळी तीनशे मुलांसाठी अभिनयाची कार्यशाळा घेतील. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेतून येणाऱ्या शिक्षक आणि पालकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रासाठी महाराष्ट्रातून राज्य नाट्य स्पर्धेला बक्षीस मिळवलेल्या तीन नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. रविवारी संध्याकाळी संमेलनाची सांगता होणार आहे.

हे सुद्धा वाचा

संत साहित्य संमेलन येत्या ११ तारखेपासून, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती !

साहित्य संमेलनात पुस्तकविक्रेत्यांची भोवनीदेखील होईना; हजारो रुपये भाडे घेऊन स्टॉलधारकांना आयोजकांनी सोडले वाऱ्यावर!

विश्व मराठी संमेलनात विदर्भाला डावलले; थेट शिंदे-फडणवीस यांच्याकडे तक्रार!

मुलांसाठी मोफत संमेलन
१८ आणि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी बेळगाव ‘पहिल्या बालनाट्य संमेलनाचे’ आयोजन करून ‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ ने एक डौलदार पाऊल पुढे टाकले आहे. हे संमेलन या तीनशे मुलांसाठी पूर्णपणे मोफत असणार आहे. त्यांची भोजनाची व्यवस्था संमेलन स्थळी करण्यात आलेली आहे. संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा माननीय मीना नाईक, ज्यांना नुकताच मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे, त्या स्वतः दोन्ही दिवस संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.

अभिनेत्री सई लोकूरच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन
बेळगावच्या प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात बेळगावमधील नाटकातून केली आहे. समारोपाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वांचे लाडके आणि प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, बेळगावचे आणखीन एक प्रसिद्ध अभिनेते प्रसाद पंडित व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी