33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईमोठी बातमी : शिवरायांचा अश्वारूढ पुतळा चोरट्यांनी पळवला !

मोठी बातमी : शिवरायांचा अश्वारूढ पुतळा चोरट्यांनी पळवला !

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सान होसे शहरातील एका उद्यानातील कांस्य धातूचा अश्वारूढ पुतळा चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उत्तर अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता. हा पुतळा कधी चोरीला गेला याची माहिती स्थनिक प्रशासनाने दिली नाही. या प्रकरणी तपास सुरु असून याबाबत माहिती असल्यास त्याबाबत प्रशासनाला कळविण्यात यावे, असे आवाहन स्थानिक लोकांना करण्यात आले आहे, अशी माहिती उद्यान विभागाने दिली आहे. ग्वादालूपे रिव्हर पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चोरीला गेला आहे, हे सांगताना आम्हाला अतिशय खेद होत असल्याचे उद्याने आणि मनोरंजन विभागाने म्हंटले आहे. ट्विटरवर त्यांनी याबाबत खेद व्यक्त केला आहे. (Thieves ran away the statue of Shivaji maharaj)

Thieves ran away the statue of Shivaji maharaj
उत्तर अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता.

ग्वादालूपे रिव्हर पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शुक्रवारपासूनच जागेवर नसल्याचे लक्षात आले, अशी माहिती स्थानिक ‘केटीव्हीयु’ वृत्त संकेतस्थळाने दिली. मात्र, ही चोरीची घटना नेमकी कधी घडली याबाबत अधिक माहिती सांगण्यास स्थानिक प्रशासनाने नकार दिल्याचे वृत्त ‘केटीव्हीयु’ने दिले आहे. सान होसे आणि पुणे या दोन शहरांमध्ये कित्येक बाबतीत साधर्म्य आहे. सान होसे या शहराचे पुण्याशी साधर्म्य असल्या कारणानेच या शहराला पुण्याची ‘सिस्टर सिटी’ असे म्हंटले जाते. सान होसे आणि पुणे या दोन शहरांमध्ये कित्येक बाबतीत साधर्म्य आहे. सान होसे या शहराचे पुण्याशी साधर्म्य असल्याकारणानेच या शहराला पुण्याची ‘सिस्टर सिटी’ असे म्हंटले जाते. दोन्ही शहरांना समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. देशातील शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखली जातात. सान होसे या शहरात अमेरिकेतील अग्रगण्य विद्यापीठे आणि महाविद्यालये आहेत. त्यामुळे पुण्याला जसे विद्येचे माहेरघर म्हंटले जाते, तशीच ओळख सान होसेची आहे, असे sanjosepunesistercity.org या संकेतस्थळाने म्हंटले आहे.

पुणे शहरकडून शिवरायांचा पुतळा भेट

सान होसे या शहराला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुणे शहराकडून भेट म्हणून देण्यात आला होता . शहराची ओळख बनलेला शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला गेल्याने अतिशय दुःख होत आहे. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी आमची याबाबत चर्चा सुरु असून आम्हाला काही माहिती प्राप्त झाल्यास त्याबाबत लगेच कळविण्यात येईल, असे ट्विटसंबंधित विभागाने केले आहे.

हे सुद्धा वाचा

शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला संभाजी ब्रिगेडचा विरोध

Chhatrapati Shivaji Maharaj : ‘महाराजांनी औरंगजेबाला माफीसाठी 5 पत्रे लिहिली होती’, भाजप प्रवक्त्याची जीभ घसरली

Chh. Shivaji Maharaj : छ. शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा भव्य पुतळा प्रतापगडावर उभारणार!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी