31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रBaramati Election: बारामती जिंकण्याची ताकद फक्त महादेव जानकरांमध्येच, रासपचे भाजपला आव्हान !

Baramati Election: बारामती जिंकण्याची ताकद फक्त महादेव जानकरांमध्येच, रासपचे भाजपला आव्हान !

इंदापूर तालुक्यातील रुई-बाबीर येथे स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेली पाणी टाकी व पाईप लाईनचा लोकार्पण सोहळा 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या लोकार्पण सोहळयाला महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्ताने राष्ट्रीय समाज पक्षाचा मेळावा रुई-बाबीर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शेवते आणि मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली.

पुणे जिल्हयातील बारामती विधानसभा व लोकसभा क्षेत्रात अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राह‍िले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या बारामतीचे आमदार आहेत. तर त्यांची बहीण सुप्रिया सुळे या बारामती मतदार संघामधून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. मागील काही वर्षांपासून बारामती मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी देशातील व महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते विशेष प्रयत्न करत आहेत. त्याच अनुशंघाने अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सप्टेंबर महिन्यात बारामतीमध्ये दौरा करून तेथील भाजपचे स्थानिक कार्यकर्ते व जनतेशी संवाद साधला होता. परंतु आता बारामती विधानसभा जिंकण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने रिंगणात उडी घेतली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते दावा केला आहे की, बारामती मतदारसंघातून निवडून येण्याची धमक फक्त राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांच्यामध्येच आहे.

सप्टेंबर महिन्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बूथ कमिटीचा मेळावा जानकर यांच्या उपस्थितमध्ये पार पडला होता. या वेळी रासप नेते सतीश तरंगे, तालुकाध्यक्ष तानाजी मारकड, तालुका संघटक तानाजी शिंगाडे, युवक तालुका अध्यक्ष आकाश पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित पाटील, जिल्हाध्यक्ष किरण गोफणे, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल मेमाणे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इंदापूर तालुक्यातील रुई-बाबीर येथे स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेली पाणी टाकी व पाईप लाईनचा लोकार्पण सोहळा 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या लोकार्पण सोहळयाला महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्ताने राष्ट्रीय समाज पक्षाचा मेळावा रुई-बाबीर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शेवते आणि मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली.

रासपचे प्रदेशाध्यक्ष शेवते म्हणाले की, महादेव जानकरांची इंदापूर तालुक्यातील लोकांमध्ये प्रंचड लोकप्रियता आहे. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत तेथील स्थानिक जनतेने महादेव जानकरांना भरभरून प्रेम व‍ मते दिली होती. बारामती मतदारसंघात लोकाभिमुख कामे करण्याची व परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता रासप मध्ये आहे. त्यामुळे तेथून‍ जिंकून येण्याची क्षमता व ताकत फक्त महादेव जानकरांमध्येच आहे.

बारामतीमध्ये लोकसभेच्या निवडणूकसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची संघटनात्मक तयारी पूर्ण झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

रुई-बाबीर येथे होणाऱ्या मेळाव्याच्या माध्यमातून बारामती लोकसभा जिंकण्याचा निर्धार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा –

Student Scholarships: ऑक्टोबर ते डिसेंबर च्या काळामध्ये विद्यार्थी या तीन शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज करू शकतात

Gang Rape : धक्कादायक! एका पुजाऱ्याने महिलेकडून पैसे उकळत केला सामुहिक बलात्कार

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा जलवा, नवे खाते मिळताच धडाका सुरू !

रासप करणार इंदापूर येथे रास्ता रोको आंदोलन –

इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने अद्यापही गाळप केलेल्या उसाची संपूर्ण एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही. याचा निषेध म्हणून 9 ऑक्टोबर रोजी रासपचे कार्यकर्ते पुणे-सोलापूर महामार्गावरील मालोजीराजे चौकात रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. साखर आयुक्तांनी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याला उर्वरीत एफआरपीची रक्कम व्याजासह देण्याचा कारखान्यास आदेश द्यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे यांनी स्पष्ट केले.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी