34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
HomeमुंबईIND vs AUS : टीम इंडियाने प्लेईंग इलेव्हनची केली घोषणा, जाणून घ्या...

IND vs AUS : टीम इंडियाने प्लेईंग इलेव्हनची केली घोषणा, जाणून घ्या कुणाला मिळाली संधी ?

टीम लय भारी

मुंबई : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या (IND vs AUS) विरोधात चार मॅचच्या टेस्ट सीरीज अगोदर सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. गुरुवारपासून सुरू होत असलेल्या अ‍ॅडलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन आव्हानाचा सामना करण्यासाठी ज्या खेळाडुंना टीम इंडिया उतरवणार आहे, त्याचा खुलासा एक दिवस अगोदरच केला आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी सीरीजच्या पिंक टेस्टमध्ये ऋद्धिमान साहाला विकेट किपिंगची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सलामीचा फलंदाज म्हणून पृथ्वी शॉला सहभागी केले आहे, तर केएल राहुल बाहेर आहे.

अ‍ॅडलेड टेस्ट : प्लेईंग इलेव्हन –

विराट कोहली (कॅप्टन), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हा. कॅप्टन), हनुमा विहारी, ऋद्धिमान साहा (विकेट किपर), रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मो. शमी, जसप्रीत बुमराह.

स्पिनर रविचंद्रन अश्विनशिवाय तीन गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह जलदगती गोलंदाज असतील. भारताने चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलच्या ऐवजी पृथ्वी शॉ ला मयंक अग्रवालचा सलामीचा जोडीदार म्हणून प्राधान्य दिले आहे.

पृथ्वी खराब फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्या तंत्रावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, परंतु कॅप्टन विराट कोहलीने मॅचच्या अगोदर पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, शुभमन गिल आणि केएल राहुल सध्या त्याच्या रणनीतीचा भाग नाहीत.

यासोबतच विकेट किपरच्या निवडीत अनुभवी ऋद्धिमान साहाला ऋषभ पंतला प्राधान्य दिले आहे. पंतने गुलाबी चेंडूने खेळण्यात आलेल्या सरावाच्या सामन्यात शतक ठोकले होते. साहाने अर्ध शतक केले होते, ज्यास संघ व्यवस्थापनाने पसंती दिली.

सोबतच उमेश यादवला तिसरा गोलंदाज म्हणून आपले स्थान परत मिळाले, जे त्याच्या सरावाच्या सामन्यातील चांगल्या कामगिरीमुळे झाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी