31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईकल्याण-डोंबिवलीत सापडले नायजेरियातून आलेले सहा प्रवासी

कल्याण-डोंबिवलीत सापडले नायजेरियातून आलेले सहा प्रवासी

टीम लय भारी

मुंबई : दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी कोरोनाग्रस्त असल्याचं आढळल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य विभागाने इतर देशांमधून आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी नायजेरिया मधून आलेले सहा प्रवासी सापडले असून या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करुन नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत अशी माहिती पालिकेच्या साथरोग प्रतिबंधक अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे(Six migrants from Nigeria found in Kalyan-Dombivali).

दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णासोबत विमानातून प्रवास केलेल्या ४२ जणांची यादी आरोग्य विभागाने सरकारकडे पाठवली आहे. या सर्व ४२ जणांची संबंधित महापालिकांकडून चाचणी केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

आफ्रिकेतून परतलेल्या १०० प्रवाशांच्या पुन्हा चाचण्या ; ४६६ प्रवासी मुंबईत दाखल

निर्बंध शिथिल होत असताना राज्य सरकारकडून नवा आदेश जारी

कोरोनाग्रस्त प्रवाशाचा एक सह-प्रवासी कल्याण-डोंबिवलीमधील असून या ५० वर्षीय गृहस्थाची आज कोरोना चाचणी केली जाणार आहे. तर दुसरीकडे रुग्ण सापडलेल्या इमारतीमधील सर्व नागरिकांचे थुंकीचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. असे असले तरी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशाच्या जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालाबाबत आरोग्य विभागाला अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झाली नसल्याचं पालिकेच्या साथरोग प्रतिबंधक अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितलं आहे.

नव्या कोरोना विषाणूनं जगाला पुन्हा धडकी, पाहा किती धोकादायक आहे ओमीक्रॉन?

‘At-Risk’ Nations’ Fliers To Pay For 7-Day Quarantine In Maharashtra

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी