33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईकरण जोहरच्या पार्टीमध्ये महाराष्ट्राचे मंत्री उपस्थित असल्याचे शेलारांनी सिद्ध करावे; किशोरी पेडणेकरांचे...

करण जोहरच्या पार्टीमध्ये महाराष्ट्राचे मंत्री उपस्थित असल्याचे शेलारांनी सिद्ध करावे; किशोरी पेडणेकरांचे आव्हान

टीम लय भारी

मुंबई: भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुंबई महानगर पालिकेकडून बॉलीवूड दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या घरी आयोजित केलेल्या डिनर पार्टीला महाराष्ट्र सरकारचे मंत्री देखील उपस्थित होते की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याच पार्टीत सहभागी झाल्यानंतर अभिनेत्री करीना कपूर आणि इतर काही बॉलिवूड सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली होती.(Kishori Pednekar challenges Ashish Shelar to prove)

मला हे जाणून घ्यायचे आहे की, करण जोहरच्या निवासस्थानी आयोजित पार्टीला महाराष्ट्र सरकारचे मंत्रीही उपस्थित होते का? सीमा खान आणि करीना कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनी पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांबद्दल काय सांगितले यात तफावत आहे. काही नावे लपवण्याचा हा प्रयत्न आहे का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला होता. त्यावर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्या पार्टीमध्ये कोण होते ते सिद्ध करावेच लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

…तेव्हा या कांचनगिरी होत्या कुठे?”; मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर महापौर किशोरी पेडणेकरांचा सवाल

Ashish Shelar : करोना काळात पालिकेत भ्रष्टाचार?; भाजपचा महापौरांवर गंभीर आरोप : आशिष शेलार

 “खोटं बोला आणि रेटून बोला हेच शिकवण्यात आले आहे का? तुम्हाला सत्ता हवीच आहे. माझ्यावर तुम्ही शितोंडे उडवले आहेत. त्याबाबत मी बघेनच. तुमच्या घाणेरड्या पत्र व्यवहारांनी खचून जाणारी किशोरी पेडणेकर नाही. तुम्ही जे पुडी सोडली आहे त्याचे पुरावे द्या. त्या पार्टीत कोण होते याचा उलघडा करावाच लागेल. दरवेळेला जनतेला फसवण्याची सुपारी घेतली आहे का? करोनाच्या विविध संकटांना सामोरे जात असताना सामान्य नागरिकांपासून उच्चभ्रू लोकांपर्यंत कोणीही बाधित होऊ नये पंतप्रधान मोदी कायम सर्व राज्यांना सतर्क करत असतात. मग प्रत्येकाला वेगळा न्याय का देत आहात. माझा सवाल आशिष शेलार यांना आहे की त्यांनी त्या पार्टीमध्ये कोण होते ते सिद्ध करावे. तुम्ही बेछूट आरोप करुन लोकांना फसवण्याच्या कामाची पद्धत लोकांना कळली आहे,” अशी टीका महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

“आशिष शेलार तुम्ही आमदार झालात पण जीव मात्र महापालिकेत घुटमळत आहे. तो कशासाठी? त्यामुळे तुम्ही केलेले आरोप सिद्ध करा. कायद्याच्या अधिकाराचा असा अपमान करु नका. तुमच्याकडे पुरावे असतील तर दाखवा ते लोकांनाही कळतील. पार्टीत कोण होते याचा पुराव्यासह खुलासा कराव अन्यथा महाराष्ट्राची आपण माफी मागावी असं आमचे मत आहे,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

Ashish Shelar : आशिष शेलार यांना धमकीचे फोन, मुंब्रा येथून दोघे अटकेत

Maharashtra: BJP leader Shelar booked for making ‘objectionable’ remark against Mayor

“तुम्ही घोटाळे झाल्याचे आरोप करत पण आजही तुम्ही नगरसेवक स्थायी समितीच्या बैठकीमध्ये असतात तेव्हा काय करतात? म्हणजे तुमचे नगरसेवक अकार्यक्षम आहेत का? ही पद्धत आता बंद करा. अनेक नगरसेवक तुमच्या या पद्धतीला कंटाळले आहेत,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

“आशिष शेलार आमदार आहेत आणि ते इतक्या बेजजाबदारपणे कसे बोलू शकतात. ज्या ठिकाणी आग लागलेलीच नाही तिथून धूर कसा काढायचा भाजपाच्या लोकांकडून शिकण्यासारखे आहे. अमित सामट हे बोलघेवडे पोपट झाले आहेत हे लोकांना कळलेले आहे. कारण नसताना तुम्ही कितीही शिवसेनेला टार्गेट केले तर लोकांसोबत आमची नाळ जोडलेली आहे. तुम्हाला चॅलेंज आहे की जे काही असेल तर समोर आणा,” असे आव्हान किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी