23 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमुंबईमंगलप्रभात लोढा यांच्या 'विधवा नामकरण' प्रस्तावाला महिला संघटनेचा आक्षेप

मंगलप्रभात लोढा यांच्या ‘विधवा नामकरण’ प्रस्तावाला महिला संघटनेचा आक्षेप

विधवा महिलांचा गंगा भागीरथी (गं. भा.) असा उल्लेख करून त्यांची समाजात ओळख करून देण्यामागे उद्देश काय आहे? सरकारी योजनेचा लाभ मिळणार असेल तर तसा उल्लेख एक वेळ समजू शकले असते. केवळ प्रसिद्धीसाठी हा सारा खटाटोप सुरू आहे. मंत्र्यांनी महिलांचे विविध प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा, असे मत जनवादी महिला संघटना आणि घरेलू कामगार संघटना अध्यक्षा किरण मोघे यांनी व्यक्त केले.

हे सुद्धा वाचा: 

मंगलप्रभात लोढा यांचा पुढाकार, महारोजगार मेळाव्यातून देणार हजारो रोजगार !

वनमंत्री मुनगंटीवार यांनी घडविला चमत्कार; महाराष्ट्रात वाघांची संख्या ४०० च्या पार !

1 कोटींचा विक्रमी दंड वसूल करणाऱ्या पहिल्या महिला तिकीट निरीक्षक

अंतिम निर्णय चर्चेनंतरच…

मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, याबाबत कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. सध्या फक्त प्रस्ताव तयार करून चर्चा करण्याची सूचना प्रधान सचिवांना केली आहे. मात्र चर्चेनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठीचा हा एक प्रयत्न असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Mangalprabhat Lodha, proposal for widows, widows as ganga bhagirathi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी