31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeक्राईमआईचा मृत्यू झाला तरुणीने संपवले जीवन

आईचा मृत्यू झाला तरुणीने संपवले जीवन

आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण कळले नसून म्हसरुळ पोलीस आकस्मिक मृत्यूच्या नोंदीनुसार तपास करत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पूजा कानोजी मानवतकर (रा. विश्वचंद्र अपार्टमेंट, हरिहरनगर, दिंडोरी रोड, म्हसरुळ) असे मृत मुलीचे नाव आहे. घरी असतांना काहीतरी कारणातून विषारी औषध प्राशन केले. घटना लक्षात येताच तिला नातलगांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असतांना तिचा (दि. १०) रोजी मृत्यू झाला.

आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या (girl killed) केल्याची घटना घडली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण कळले नसून म्हसरुळ पोलीस आकस्मिक मृत्यूच्या नोंदीनुसार तपास करत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पूजा कानोजी मानवतकर (रा. विश्वचंद्र अपार्टमेंट, हरिहरनगर, दिंडोरी रोड, म्हसरुळ) असे मृत मुलीचे नाव आहे. घरी असतांना काहीतरी कारणातून विषारी औषध प्राशन केले. घटना लक्षात येताच तिला नातलगांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असतांना तिचा (दि. १०) रोजी मृत्यू झाला.(The girl killed her mother died. )

त्यानंतर माहिती कळताच म्हसरुळ पोलीस ठाण्याचे हवालदार विजय गोसावी दाखल झाले. यानंतर त्यांनी पंचनामा करुन माहिती घेत नोंद केली.

दरम्यान, मृत पूजा ही काही महिन्यांपासून परभणी येथील मूळगावाहून नाशिकमधील काकूकडे वास्तव्यास होती. तिचे वडील कानोजी व भाऊ हे खासगी वाॅचमन म्हणूण काम करतात. तिच्या आईचे निधन झाले असून ती सध्या शिक्षण न घेता घरीच काम करत होती. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. तपास गोसावी करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी