30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeमुंबईBMC : मुंबईतील शौचालयांमध्ये करोडोंचा घोटाळा !

BMC : मुंबईतील शौचालयांमध्ये करोडोंचा घोटाळा !

एकीकडे मुंबईत 'पे अँड यूज' या सार्वजनिक शौचालयाची(toilets)कमतरता असल्याने जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

एकीकडे मुंबईत ‘पे अँड यूज’ या सार्वजनिक शौचालयाची(toilets)कमतरता असल्याने जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे ‘पे अँड युज’ च्या सार्वजनिक शौचालयावर अक्षरशः चढ्या बाजारभावाने बोली लावत ते भाड्याने चालवायला देऊन अमाप पैसा कमाविण्याचे मोठे साधन बनले आहे. यावर कोणाचे ही नियंत्रण नसल्याने बिनधास्तपणे हे शौचालय भाड्याने चालवायला देण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.

भाड्याने शौचालय (toilets) चालवयला दिले जात असल्याने शौचालयामधील स्वच्छतेची ही ऐसी की तैसी झालेली आहे. एका – एका संस्थेचे दहा ते बारा किंवा त्याहून अधिक पंचवीस- तीस सार्वजनिक शौचालय असून त्यावर ते करोडपती झालेले आहेत. मात्र महानगरपालिकेला या सार्वजनिक शौचालय मधून एकाही पैशाचा फायदा होत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

मुंबईत सध्या 846 पे अँड यूज चे सार्वजनिक शौचालय आहेत. ‘बांधा आणि वापरा’ या योजने अंतर्गत हे ‘पे अँड युज’ चे सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलेले आहेत. हे सार्वजनिक शौचालय पदपथावर, उड्डाणपूलाखाली, स्थानकाबाहेर आणि मैदानाबाहेर पाहायला मिळतात.

माजी सनदी अधिकारी रत्नाकर गायकवाड यांनी सर्वरप्रथम दादर फुल मार्केट येथे सार्वजनिक शौचालय उभारले होते. तेव्हा ते मनपा मध्ये अतिरिक्त आयुक्त पदी होते. जे कोणी सार्वजनिक शौचालय चालवायला घेईल, त्यांनी त्या बदल्यात झोपडपट्टी मधील शौचालयाची स्वच्छता राखण्याची जबाबदारी उचलावी, या अटीवर रत्नाकर गायकवाड यांनी सार्वजनिक शौचालय उभारण्यास दिले होते. पुढे गायकवाड यांची बदली झाली आणि त्यांची योजना पुढे कार्यरत न होता त्याचे बाजारीकरण झाले.

‘बांधा आणि वापरा’ या योजने अंर्तगत 10 शौचकूपचे शौचालय उभारण्यासाठी साधारणपणे 20 लाख रुपये खर्च येतो. हा खर्च शौचालय चालवायला घेणाऱ्या संस्थांना करावा लागतो. त्यामुळे महापालिकेच्या पैशाची बचत होते. स्वखर्चाने शौचालय उभारणाऱ्या संस्था लोकांकडून प्रसाधनगृह आणि आंघोळीसाठीचे शुल्क आकारू शकतात, याकरिता मनपाने परवानगी दिलेली आहे. संस्थेला केवळ पाण्याचे बिल आणि लाईट बिल भरणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

‘बांधा आणि वापरा’ या तत्वावर सार्वजनिक शौचालय उभे करण्याची योजना १९९८ मध्ये आली. लोकांना चांगली सुविधा मिळावी आणि महापालिकेच्या पैशांची बचत व्हावी, हा यामागील हेतू होता.सध्या ‘पे अँड यूज’ च्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्यासाठी लोकांना पाच रुपये मोजावे लागत आहे. एखाद्या रेल्वे स्थानकाबाहेर वा मार्केट किंवा गर्दीच्या ठिकाणी पे अँड यूज चे सार्वजनिक शौचालय असेल तर येथे हजारों लोक सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असल्याने त्याची दिवसाची कमाई ही लाखाच्या घरात आहे. म्हणजे, महिना जास्तीत जास्त दहा ते पंधरा लाख रुपयांची मिळकत असून कमीत कमी महिना पाच लाख रुपये शौचालयातून मिळत आहे.

यानुसार,’पे अँड यूज’ च्या दहा ते पंधरा शौचालय मधून वर्षाला करोड रुपयांची मिळकत होत असल्याने मुंबईचे शौचालयवाले लय करोडपती बनलेले आहेत. यातील काही संस्था राजकीय नेत्या मंडळींची आणि बड्या अधिकाऱ्यांची असल्याची माहिती विश्वसनीयसूत्रांनी दिली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर करोडो रुपये कमविण्याचे साधन शौचालय असले तरी यातून मुंबई महानगरपालिकेला एकही पैसा मिळत नाही. विशेष म्हणजे, काही संस्थांनी स्वतः चे पे अँड यूज चे शौचालय भाड्याने चलावयला देऊन त्यातूनही घर बसल्या ते महिना लाखों रुपयांचे उत्पन्न एका शौचालयाच्या भाड्यातून मिळवत असल्याची माहिती ही विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

Milk Price : दूध दर वाढीचे संकट लवकरच कोसळणार

Eknath Shinde : ‘एकनाथ शिंदेंची सभा होईल, पण लहान पोरांना सांभाळणार कोण?’

Eknath Shinde : ‘मंत्रीमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापर्यंत नाही’

दरम्यान, ‘पे अँड यूज’ च्या पॉलिसीत एखाद्या संस्थेला कितीही शौचालय उभारण्यासाठी कसले ही बंधन नाही. एका – एका संस्थेने दहा ते वीस व त्याहून अधिक तीस शौचालय ही ‘पे अँड यूज’ अंतर्गत शौचालय उभारलेले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने एका – एका संस्थेचे शौचालय असल्याने स्वच्छता संदर्भात प्रश्न चिन्ह उभे राहतात, हे जरी खरे असले तरी यावर नवीन पॉलिसी ठरणे आवश्यक आहे. नवीन पॉलिसी मध्ये एका संस्थेला केवळ चारच शौचालय चालविण्यासाठी बंधनकारक करण्यात यावे. जेणेकरून शौचालयावर सुरू असलेला बाजार थांबेल. संस्थेकडून व्यवस्थितपणे शौचालयाच्या स्वच्छतेचे काम होईल. लोकांना चांगली सुविधा मिळून ‘पे अँड यूज’ या तत्वावर चालणारी सार्वजनिक शौचालयाची योजना खऱ्या अर्थाने मार्गी लागेल, असे स्पष्ट मत मनपाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी