31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeमनोरंजनNitin Gadkari : अक्षय कुमार यांच्या जाहिरातीवरून नितीन गडकरी 'टार्गेट'

Nitin Gadkari : अक्षय कुमार यांच्या जाहिरातीवरून नितीन गडकरी ‘टार्गेट’

नागरिकांचा रस्ते प्रवास आणखी सुरक्षित व्हावा म्हणून रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून वाहनांमध्ये 6 एअरबॅग्स लावण्याबाबतचे धोरण सुरू केले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीवने हे धोरण आणले असले तरीही प्रत्यक्षांत आदेश पाळणाऱ्यांची संख्या बोटावर मोजणाऱ्यांइतकीच पाहायला मिळते, त्यामुळे सरकारकडून याबाबत प्रबोधन केले जात आहे

रस्ते प्रवास आणखी सुरक्षित व्हावा म्हणून केंद्र सरकार वेगवेगळे प्रयोग करीत असते आणि याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी कायमच पुढाकार घेत असतात, नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत सहजपणे ते पोहोचत असतात. रस्ते अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने कारमध्ये 6 एअरबॅग्स  लावण्याचे धोरण राबवण्यास सुरू केले आहे. रस्ते अपघात नेहमीचाच विषय म्हणून त्यावर दुर्लक्ष करून चालणार नाही, तर हे अपघात कसे थांबवता येतील, जीवीतहानी कशी टाळता येईल याचा या माध्यमातून विचार केला जाणार आहे. याबाबतच जनजागृती करण्यासाठी सरकारकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या जाहिरातीचा थेट फटका नितीन गडकरींना बसला आहे.

नागरिकांचा रस्ते प्रवास आणखी सुरक्षित व्हावा म्हणून रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून वाहनांमध्ये 6 एअरबॅग्स लावण्याबाबतचे धोरण सुरू केले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीवने हे धोरण आणले असले तरीही प्रत्यक्षांत आदेश पाळणाऱ्यांची संख्या बोटावर मोजणाऱ्यांइतकीच पाहायला मिळते, त्यामुळे सरकारकडून याबाबत प्रबोधन केले जात आहे. यासंदर्भात एक जाहिरात प्रसिद्ध केली असून यामध्ये अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेच दिसत आहे. या जाहिरातीच्या माध्यामातून लोकांना एअर बॅग्जचे महत्त्व पटवून देणे इतकंच असताना सुद्धा या जाहिरीतीवरून वादंग सुरू झाला आहे. राजकीय नेते थेट नितीन गडकरींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत.

हे सुद्धा वाचा…

Milk Price : दूध दर वाढीचे संकट लवकरच कोसळणार

Eknath Shinde : ‘एकनाथ शिंदेंची सभा होईल, पण लहान पोरांना सांभाळणार कोण?’

Media Scrutiny: मी माझ्या हॉटेल रूममध्ये वर्तमानपत्र टाकण्यास मनाई केली होती : सौरव गांगुली

सदर जाहिरातीत असं दाखवण्यात आले आहे की, लग्नानंतर मुलीची पाठवणी सुरू असते, वधू तिच्या वडिलांनी तिला गिफ्ट केलेल्या कार मध्ये बसून रडत असते. सगळेजण मुलीची पाठवणीवर भावनाशील होत उभे असतात. त्यावेळी अक्षय कुमार त्या मुलीच्या वडिलांच्या शेजारी पोलिसांच्या वेशात उभा असतो. त्यावेळी अक्षय कुमार आणि त्या मुलीच्या वडिलांचे संभाषण सुरू होते. त्यावेळी अक्षय कुमार म्हणतो तुम्ही दिलेल्या कारमध्ये 6 एअरबॅग्स नाहीत, तर मग मुलगी रडणार नाही तर काय करेल असे म्हणून तो गांभीर्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने बोलायला लागतो. ते घाबरून जातात, आणि लगेचच मुलीसाठी 6 एअरबॅग्सची दुसरी कार उभी राहते. दरम्यान या जाहिरातीत हुंडा पद्धतीला समर्थन दिल्याचे म्हणत या जाहिरातीवर समाजमाध्यांतून प्रचंड टीका करण्यात येत आहे.

सदर जाहिरातीचा व्हिडिओ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे. हे ट्विट पुन्हा रिट्विट करत शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी नितीन गडकरींवर टीका केली आहे. ट्विटमध्ये चतुर्वेदी म्हणतात, सरकार कार सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी पैसा खर्च करत आहे की हुंडा प्रथेसाठी? असा सवाल करीत ही एक प्रॉब्लेमेटिक (समस्यापूर्ण) जाहिरात आहे. ही क्रिएटिव्हिटी कोणालाही आवडणार नाही. सरकार वाहन सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी पैसे खर्च करतंय की, या जाहिरातीद्वारे हुंड्याच्या वाईट आणि गुन्हेगारी प्रथेला प्रोत्साहन देत आहे? असे म्हणून त्यांनी जाहिरातवरून चांगले झापले आहे. शिवाय भारत सरकार अधिकृतपणे हुंड्याला प्रोत्साहन देत आहे हे पाहून वाईट वाटलं असे म्हणून टीएमसीचे राष्ट्रीय प्रवक्ते, साकेत गोखले यांनी सुद्धा केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी