31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईखासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नामुळे महत्त्वाचा निर्णय

खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नामुळे महत्त्वाचा निर्णय

रवींद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई : उत्तरमुंबईच्या मालाड पश्चिम येथील गायकवाड नगर येथील म्हाडा वसाहतने देखील ₹.९६,३६,१४६ लाख भरले आहेत आणि महानगरपालिकेद्वारे मूलभूत सुविधा देखील पुरविल्या जातील. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या सततच्या प्रयत्नातून मुंबईतील म्हाडा वसाहतमध्ये सांडपाण्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जारी केला आहे.(MP Gopal Shetty of important decision due to the efforts)

गायकवाड नगरमधील रहिवाशांच्या पाणीप्रश्नाबाबत खासदार गोपाळ शेट्टी हे म्हाडा, मुंबई महापालिकेशी सातत्याने पत्रव्यवहार आणि बैठका घेत होते. मालाड पश्चिम मालवणी येथील गायकवाड नगरमधील 5000 रहिवाशांना नवीन जलवाहिन्या देऊन पाण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळावी, अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी 2018 पासून केली होती, त्यासाठी मुंबई महापालिकेने पाणी पूर्वाथ्या प्रणालीला जलयुक्त नाव दिले आहे. (पाणी बिल रक्कम) म्हाडाने भरावयाची व मूलभूत सुविधांची जबाबदारी महापालिकेकडे हस्तांतरित करावी.

एकूण देय रक्कम ₹ १,४०,९८,८६८ सारख्या प्रचंड रकमेचा संपूर्ण तपशील खा.गोपाळ शेट्टी यांनी मुंबई महानगरपालिका, म्हाडा, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. योगेश म्हसे यांना दिले.सातत्यानं केलेले प्रयत्न, प्रत्यक्ष भेटीगाठी आणि पाठपुरावानंतर मालवणीच्या गायकवाड नगरच्या मुलभूत सुविधांसाठी मोठे यश मिळाले.

महाराष्ट्र गृहनिर्माण विभागाला दिनांक २१.१.२०२१ आणि २६.२.२१ च्या पत्रांद्वारे कळविण्यात आले आहे की महानगरपालिका मुंबईतील महाडा अंतर्गत ५६ वसाहतींना सांडपाणी, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवणार आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबई महानगरपालिकेचा 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प सादर

मुंबई महापालिका निवडणूक : प्रभागांच्या राजकारणात निवडणूकांचा बार कधी फुटणार?

मुंबई महापालिका Omicron ला रोखण्यासाठी सज्ज; महापौरांनी मुंबईकरांना केलं आवाहन,म्हणाल्या…

Mumbai Congress plans to take morcha to BJP MP Gopal Shetty’s house

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी