33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeमुंबईMumbai Toilet Story : मुंबई महापालिका घडवतेयं शौचालय सम्राट!

Mumbai Toilet Story : मुंबई महापालिका घडवतेयं शौचालय सम्राट!

सध्या 'पे अँड यूज'च्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्यासाठी लोकांना पाच रुपये मोजावे लागत आहे. एखाद्या रेल्वे स्थानकाबाहेर वा मार्केट किंवा गर्दीच्या ठिकाणी पे अँड यूज चे सार्वजनिक शौचालय असेल तर येथे हजारों लोक सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असल्याने त्याची महिन्याची कमाई ही लाखाच्या घरात आहे.

शिक्षण सम्राट, साखर सम्राट पाठोपाठ आता शौचालय सम्राट ही घडू लागले आहेत. वर्षानुवर्षे ना कोणते करारपत्र, ना कोणते भाडे शुल्क भरता ‘पे अँड यूज’ तत्वावर शौचालय चालविणारे करोडो रुपये कमवत शौचालय सम्राट झाले आहेत. मात्र मुंबई महापालिका प्रशासनाला एकाही पैशाचा फायदा होत नसल्याचे समोर आले आहे. लोकांना रस्त्यावरुन जाताना वा सार्वजनिक ठिकाणी सहजपणे शौचालय उपलब्ध व्हावेत, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत लोकसेवेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेने ‘पे अँड यूज’ तत्वावर सार्वजनिक शौचालय सुरू केले आहे. हे प्रकरण इतके मोठे आहे की काही शौचालय सम्राटांनी मुंबईतच नव्हे तर संपुर्ण राज्यभर आपले साम्राज्य थाटले आहे.

मुंबईत 1998 पासून ‘पे अँड यूज’ शौचालय योजनेला सुरुवात झाली. मात्र महापालिका प्रशासनाने शौचालय बांधण्याची जबाबदारी घेतली नाही. ज्यांना कोणाला ‘पे अँड यूज’ शौचालय चालवायचे आहे, त्यांनी स्वतः स्वखर्चाने शौचालय बांधायचे, अशी अट घालण्यात आली. जेणेकरून शौचालय बांधण्यासाठीचा खर्च महापालिकेचा वाचवा, हा यामागील हेतू होता. पे अँड यूज शौचालयसंबंधी मनपाने संस्थांसोबत कोणत्याही प्रकारचे सामंजस्य करार किंवा करार केलेले नाही. केवळ शौचालय उभारण्यासाठी संस्थांना परवानगी देऊन शौचालय चालविण्यासाठी दिले गेलेले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या जागेचे कोणत्याही प्रकारचे शुल्क आणि महिना भाडे शुल्क संस्थांना भरावे लागत नाही.

हे सुद्धा वाचा…

सीतारमण यांची भाषा बारामतीच्या जनतेला सहज समजेल – शरद पवार

BMC : मुंबईतील शौचालयांमध्ये करोडोंचा घोटाळा !

Shivajirao Adhalarao Patil : शिंदे गटातील नेते आढळराव पाटलांच्या अडचणीत वाढ

शौचालय मध्ये स्वच्छता राखण्यासाठी जी व्यक्ती असते, त्याच व्यक्तीला प्रसाधनगृहाचा वापर करणाऱ्या लोकांकडून शुल्क घेण्याचे ही काम करावे लागते. यामुळे त्या व्यक्तीला शौचालयामध्ये 24 तास रहावे लागत असले तरी अगदी तुटपुंज्या पगारात राबावे लागते. त्यात शौचालयात स्वच्छता राखण्यासाठी साधनसुविधा ही पुरेसे नसल्याने अस्वच्छता पसरलेली असते. याबाबत लोकांच्या अनेक तक्रारी येत असतात.

शौचालयाच्या अस्वच्छतेच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेत काही वर्षांपूर्वी अस्वच्छ शौचालय संस्थाकडून काढून घेऊन ते मनपाने ताब्यात घ्यावेत, असे फर्मान माजी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्वतः च्या आयुक्तपदी कार्यकाळात काढले होते. मात्र संस्थांनी एका राजकिय नेत्याकडे साकडे घालत मेहता यांचा निर्णय रद्द करण्यास भाग पाडले होते. पण आज ही शौचालयाच्या अस्वच्छतेमुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या ‘पे अँड यूज’ च्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्यासाठी लोकांना पाच रुपये मोजावे लागत आहे. एखाद्या रेल्वे स्थानकाबाहेर वा मार्केट किंवा गर्दीच्या ठिकाणी पे अँड यूज चे सार्वजनिक शौचालय असेल तर येथे हजारों लोक सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असल्याने त्याची महिन्याची कमाई ही लाखाच्या घरात आहे. त्यात महापालिकेने पे अँड यूज शौचालय किती चालवावेत, याबद्दल कोणत्याही प्रकारचे बंधने आखलेली नाहीत. यामुळे कित्येक संस्थेचे वीस ते तीस शौचालय सुरू आहेत.

त्यात पे अँड यूज शौचालय चालविण्यासंबंधी कोणत्याही प्रकारचे करार महापालिका प्रशासनाने संस्थेसोबत केले नसल्याने कित्येकांनी शौचालय दुसऱ्यांना विकले आहेत तर कित्येकांनी शौचालय भाड्याने ही चालविण्यासाठी दिलेले आहेत. शौचालयामधून लाखों – करोडो रुपये मिळत असले तरी एकाही पैसाचा हिशोब संस्थांना महापालिका प्रशासनाला द्यावा लागत नाही. शौचालय चालविणाऱ्या संस्था या राजकीय नेत्या मंडळींची आणि बड्या अधिकाऱ्यांची असल्याची माहिती विश्वसनीयसूत्रांनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी