मुंबई

डबल इंजिन सरकार नसल्याने मागील काळात विकास खुंटला; पंतप्रधान मोदी यांची टीका

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने स्वराज्य आणि सुराज्याची भावना आजच्या भारतात डबल इंजिन सरकारमध्ये प्रभावशाली ठरत आहे. मागील काळात डबल इंजिन सरकार नसल्याने कामांमध्ये अडथळे आले मागच्या काळात गरीबांचा पैसा, करदात्यांच्या पैशाबाबत आपण संवेदनशील नव्हतो, अशी घणाघाती टीका मागील सरकारवर करतानाच आता मात्र डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास होत आहे, मुंबई देशाची धडकन आहे. शिंदे आणि देवेंद्रची जोडी तुमची स्वप्ने साकार करेल हा विश्वास आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (Prime Minister Modi criticized the previous government from the Rally in Mumbai)

पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर होते. त्याच्या उपस्थितीत आज बिकेसी मैदानावर भव्य सभा झाली. तसेच मोदींच्या हस्ते मेट्रो ७ आणि २ ‘अ’ चे देखील उद्घाटन झाले. यावेळी मोदी यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात करत मुंबईकरांना साद घातली.  यावेळी मोदी म्हणाले, या आधी आपण केवळ गरीबीवरच चर्चा करत होतो. आपण जगाकडे मदतीची याचना करुन कसेतरी आपली गरज भागवत होतो. मात्र स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारताने आता मोठी स्वप्ने पहायला सुरु केली असून ती स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद देखील निर्माण केली आहे.

हे सुद्धा वाचा

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा विनयभंग

PHOTO : पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शाबासकी

पुण्यात येत्या रविवारी हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन

यावेळी मोदी यांनी यावेळी फेरीवाल्यांसाठी राबविलेल्या स्वनिधी योजनेचा देखील आढावा घेतला. ते म्हणाले स्वनिधी योजना स्वाभीमानाची जडीबु्ट्टी आहे. डिजीटल ट्रेनिंगसाठी मुंबईत सव्वा तीनशे कॅम्प लावले. त्यामुळे फेरीवाले डिजीटल व्यवहार करु लागले. देशभरात ५० हजार कोटींचे डिजीटल व्यवहार केले. ही निराशावाद्यांसाठी मोठी चपराक आहे. अशक्य काहीच नाही. सबका प्रयास या भावनेतून मुंबईला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहोत. फेरीवाल्यांना माझे सांगणे आहे, तुम्ही दहा पाऊले चाला मी ११ पाऊले चालेन. मला भरोसा आहे छोट्या लोकांच्या परिक्षमामुळे देश वेगळ्या उंचीवर जाईल.

 

प्रदीप माळी

Recent Posts

अरविंद केजरीवाल सुपर हिरो, नरेंद्र मोदी व्हीलन

राष्ट्रीय आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाने जामिनावर सुटका…

21 mins ago

काँग्रेसच्या काळात आमच्याकडे खूप विकास झाला, नरेंद्र मोदींचा काळ अत्यंत वाईट

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता  होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…

1 hour ago

दाभोलकर हत्ये प्रकरणी दोघांना जन्मठेप तर सबळ पुराव्याअभावी तिघांची निर्दोष मुक्तता

डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.(Narendra Dbholakar Murder case: Pune court…

2 hours ago

नगरमधील या पट्ट्याने व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले, आता गुऱ्हाळ व रसवंती धंदा जोरात चालवतोय

लोकसभा निवडणुकीचा(Loksabha Election 2024) तिसरा टप्पा लवकरच होवू घातला या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना…

3 hours ago

BMC देणार मुंबईतील या  चौकाला ‘श्रीदेवी कपूर’ चं नाव

  बॉलीवूडची हवाहवाई गर्ल, अभिनेत्री श्रीदेवी जिने ८०-९० चं दशक गाजवलं, चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.(BMC…

4 hours ago

काय झालं मोदींनी दिलेल्या गॅरंटीचं

२०२४ ची लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात पोहचली असून मागील तीन टप्प्याचे मतदान पाहता मतदारांनी कमी…

4 hours ago