35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईम्हाडामार्फत टाटा, कोहिनूर मिलमधील चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

म्हाडामार्फत टाटा, कोहिनूर मिलमधील चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

लय भारी न्यूज नेटवर्क
नागपूर : धोकादायक स्थितीत असलेल्या मुंबईतील टाटा आणि कोहिनुर मिलमधल्या चाळींच्या पुनर्विकासाबाबत ‘म्हाडा’ सकारात्मक असून याबाबत केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाच्या मदतीने राज्य सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली. नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन खासदार शेवाळे यांनी आपल्या मागणी संदर्भातील पत्रक मुख्यमंत्र्यांना दिले.
खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या पत्रकात असे नमूद केले आहे की, टाटा आणि कोहिनुर मिल अनेक वर्षांपूर्वी बंद झाल्या असल्या तरीही या मिलमधील कामगार अद्यापही इथल्या जर्जर चाळींमध्ये राहत आहेत. केंद्र सरकारच्या ‘नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन’ (एनटीसी) अखत्यारीत असलेल्या या मिलमधील चाळींच्या पुनर्विकासाबाबत, मी यापूर्वीच कॉर्पोरेशचे चीफ जनरल मॅनेजर यांची भेट घेतली आहे. तसेच याविषयी म्हाडाच्या अध्यक्षांना भेटले असता त्यांनी या चाळींच्या पुनर्विकासाबाबात सकारात्मक प्रतिसाद दिला होता. अशा परिस्थितीत, राज्य सरकारने, केंद्र सरकारच्या सहकार्याने संबंधित यंत्रणांना आदेश देऊन, या चाळींच्या पुनर्विकासला गती द्यावी, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे.
या भेटीदरम्यान, मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबतही लेखी मागणी खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुंबईतील वरळी, नायगाव, परळ परिसरातील सर्व बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला मागील सरकारने मान्यता दिली होती. मात्र, मालकी हक्क, भाडेकरार अशा काही बाबींमुळे हा पुनर्विकास अद्याप रखडला आहे. या चाळींमध्ये राहणाऱ्या सुमारे 16 हजार कुटुंबाना न्याय देण्यासाठी, स्थानिक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि रहिवाशी यांची एक संयुक्त बैठक आयोजित करून या चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी