30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeमुंबईSanjay Raut : संजय राऊतांचा कारागृहातील मुक्काम वाढला! न्यायालयाने जामीन अर्जावर दिले...

Sanjay Raut : संजय राऊतांचा कारागृहातील मुक्काम वाढला! न्यायालयाने जामीन अर्जावर दिले खास निर्देश

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊतांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने 10 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दणका दिला आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊतांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने 10 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जून 2020मध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीमार्फत अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. कालांतराने राऊत यांना आर्थर रोड तुरुंगात हलवण्यात आले. त्यानंतर राऊतांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणीसाठी पीएमएलए न्यायालयाने पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला करण्यात येईल असे निर्देश दिले आहेत.

मुंबईतील गोरेगाव भागात स्थित असलेल्या पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. याठिकाणी एकुण 672 कुटुंबियांचे पुनर्वसन 2008 साली रहिवाशांनी मे. गुरू आशिष कन्स्ट्रकश्नची नियुक्ती केली होती. त्यानंतर मात्र, या कॉन्ट्रॅक्टरने या जमिनीचा काही भाग खाजगी बांधकाम व्यावसायिकाला विकला. प्रविण राऊत यांच्यावर याप्रकरणात फसवणूक केल्याचा मुख्य आरोप आहे. आशिष कन्ट्रक्शनला पत्राचाळीत एकुण 3000 फ्लॅट बांधून 672 कुटुंबियांना भाडेतत्वावर देण्याचे आदेश देण्यात आले होते. उरक्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटले जाणार होते. मात्र, 2010साली प्रविण राऊत यांनी या कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर्स एचडीआयएल कंपनीला विकले. याप्रकरणार पुढील तपास केल्यानंतर प्रविण राऊत यांच्यानावे तब्बल 100 कोटी रुपये एचडीआयएलमधून वळवण्यात आले असल्याचे समोर आले.

हे सुद्धा वाचा

Mansson Alert : राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात! अनेक ठिकाणी यलो अलर्ट जाहिर

Eknath Shinde Camp: बाळासाहेब ठाकरेंचा सर्वात जवळचा व्यक्तीसुद्धा एकनाथ शिंदे गटात सामिल

PFI : तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा ‘पीएफआय’ ला केले खिळखिळे

2010 साली झालेल्या या आर्थिक घोटाळ्यातील 55 लाखांची अनामत रक्कम प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यातून वर्षा राऊत यांच्या खात्यावर टाकण्यात आली. वर्षा राऊत या शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या पत्नी आहेत. त्यानंतर वर्षा यांनी ही रक्कम मुंबईतील दादर परिसरात स्थित असलेला फ्लॅट विकत घेण्यासाठी वापरली असल्याचा दावा ईडीमार्फत करण्यात आला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात राज्यसभा खासदार संजय राऊत यांना चोकशीसाठी ईडीने ताब्यात घेतले. त्यानंतर याप्रकरणात संजय राऊत यांचा देखील थेट सहभाग असल्याचा दावा ईडीने केला आहे. याच आरोपाखाली सध्या संजय राऊत आर्थर रोड तुरुंगात आहेत. आणि गेल्या 3 महिन्यांपासून जामीन मिळावा यासाठी धडपड करत आहेत. शिवाय संजय राऊतांनी गेल्या काही काळात भाजप आणि सरकारमधून फुटलेल्या आणि सध्या सत्तेत असलेल्या शिंदे गटावर सडकून टीका केली होती. त्यामुळे राऊतांवरील ही कारवाई सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून वारंवार केला जात आहे. मात्र, यासंपूर्ण प्रकरणात सध्यातरी राऊतांना 10 ऑक्टोबरपर्यंत कारागृहाची हवा खावी लागणार हे निश्चित झाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी