31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeमुंबईSharad Pawar : 'शेतकरी दिना'निमित्त शरद पवारांचं खास Tweet ! म्हणाले...

Sharad Pawar : ‘शेतकरी दिना’निमित्त शरद पवारांचं खास Tweet ! म्हणाले…

टिम लय भारी

मुंबई : केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्यां विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. गेल्या 26 दिवसांपासून शेतकरी कडाक्याच्या थंडीत हे आंदोलन करत आहेत. आज देशभरात राष्ट्रीय शेतकरी दिन (National Farmers Day) साजरा केला जात आहे. अशात आता माजी केंद्री कृषीमंत्री आणि राष्ट्रीवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ट्विट केलं आहे. बळीराजाला न्याय मिळावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

शरद पवारांनी ट्विट करताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलं की, अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. परंतु आज दुर्दैवानं देशाच्या शेतकऱ्याला त्यांचे हक्क आणि मागण्यांसाठी आंदोलन करावं लागत आहे. देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो असंही ते म्हणाले आहेत. शेतकरी आंदोलन थांबवण्यात अद्यापही केंद्र सरकारला यश न आल्यानं पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पवारांनी केलेलं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे.

उद्या राष्ट्रपतींना भेटणार राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वखालील शिष्टमंडळ गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांची भेट घेणार आहे. 3 कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीचे 2 कोटी सह्यांचे निवेदन ते यावेळी राष्ट्रपतींना देणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी