31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeसंपादकीयरात्रीची संचारबंदी आदेश, न्हाणीला बोळा.. दरवाजा उघडा

रात्रीची संचारबंदी आदेश, न्हाणीला बोळा.. दरवाजा उघडा

  • अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार

तुम्हाला 31 डिसेंबरची संपूर्ण रात्र धमाल करत नवीन वर्षाचे स्वागत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कोणत्याही नगरपालिका क्षेत्रातील हॉटेल किंवा क्लबमध्ये हे सर्व विनासायास करू शकता. फक्त ते हॉटेल किंवा क्लब महापालिका क्षेत्रात नाही (Night curfew) याची खात्री करून घ्या.

ब्रिटन मधून नव्याने अस्तित्वात आलेल्या कोरोनाच्या नवीन वायरसच्या पार्श्वभूमीवर तसेच वाढती रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी राज्य सरकारने महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 अशी संचारबंदी जारी केली आहे. 22 डिसेंबर पासून 5 जानेवारी पर्यंत हा आदेश लागू आहे. पण हा आदेश काढताना यातील फोलपणा ना सरकार अथवा अधिका-यांच्या लक्षात आला. पण चाणाक्ष पर्यटकांनी यातील नेमका अर्थ लक्षात घेऊन मग महापालिका क्षेत्र सोडून राज्यातील अन्य नगरपालिका क्षेत्रातील पर्यटन स्थळी धाव घेण्यास सुरुवात केली आहे. कारण संचारबंदीचा आदेश फक्त जिथे महापालिका आहे तिथेच लागू होणार आहे. यात नगरपालिका अथवा नगर परिषद समाविष्ट नाही.

नेमका याचा फायदा घेत आता शेकडो पर्यटकांनी महाबळेश्वर , पन्हाळा, माथेरान तसेच जिथे नगरपालिका क्षेत्रात क्लब तसेच हॉटेल आहेत तिथे धाव घेतली आहे. या सर्व ठिकाणी कोणतेही नियम लागू असणार नाहीत. पूर्ण रात्रभर पार्टी केली तरी कोणीही विचारणार नाही.

खरे तर कोणताही आदेश हा संभाव्य धोका टाळण्यासाठी लागू होतो. ,पण तो जारी करताना किमान तारतम्य ठेवणे अपेक्षित असते. नवं वर्षाच्या स्वागत च्या पार्श्वभूमीवर तसेच नाताळ आणि ख्रिसमस यामुळे सर्वत्र पर्यटकांची गर्दी होते. रात्रभर नुसता धिंगाणा करून पार्ट्या साजऱ्या होतात. कोरोना चा प्रभाव रोखण्यासाठी जर रात्री चो संचारबंदी महापालिका क्षेत्रात लागू करण्यात आली असेल तर नगरपालिका आणि परिषद त्यातून का वगळण्यात आले, असा सवाल अनेक वैद्यक तज्ञांनी उपस्थित केला आहे.

जिथे गर्दी आणि पार्ट्या होतील तिथे नियमांचे पालन अजिबात होत नाही. मग ते महापालिका असो को नगरपालिका क्षेत्र असो.नेमके हे राज्य सरकारच्या कसे लक्षात आले नाही असा सवाल विचारला जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी