27 C
Mumbai
Tuesday, August 22, 2023
घरक्रीडाफोटो जर्नालिस्ट अतुल कांबळे यांना जागतिक किर्तीचे दोन पुरस्कार

फोटो जर्नालिस्ट अतुल कांबळे यांना जागतिक किर्तीचे दोन पुरस्कार

फोटो जर्नालिस्ट अतुल कांबळे यांनी यंदाच्या MPB द्वारे प्रायोजित जागतिक क्रीडा छायाचित्रण पुरस्कार 2023 च्या स्पर्धेत दोन पुरस्कार पटकावून बाजी मारली आहे. क्रिकेट आणि जिम्नॅस्टिक या दोन स्पोर्ट फोटोग्राफी प्रकारात अतुल कांबळे यांना विशेष उत्तेजनार्थ गटात पुरस्कार जाहीर झाले आहेत. जागतिक क्रीडा फोटोग्राफी स्पर्धेचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. जगभरातील 70 हून अधिक देशांमधून 700 फोटोग्राफर्सनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. ‘मिड डे’ या सायंदैनिकाचे प्रधान छायाचित्रकार (प्रिन्सिपल फोटोग्राफर) असलेल्या अतुल कांबळे यांनी हे दोन फोटो टिपले होते.

अतुल कांबळे यांनी 25 ऑगस्ट 2022 रोजी वांद्रे पूर्वेकडील गरीबनगर झोपडपट्टीत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जिम्नॅस्टिकचा सराव करणाऱ्या मुलांचा फोटो टिपला होता. तर दुसरा फोटो शिवाजी पार्कवर बॅटिंगचा सराव करणाऱ्या खेळाडूंचा होता. याआधी जागतिक फोटो स्पर्धेत अतुल कांबळे यांनी सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या दिवशी त्याचे चाहते मोबाईलमधून आपल्या क्रिकेटच्या देवाचे अर्थात सचिनचे फोटो काढतानाचा फोटो काढला होता. त्याला आशिया खंडातून जागतिक दर्जाचा प्रथम पुरस्कार मिळाला होता.

हे सुद्धा वाचा 

एसआरएतील अधिकाऱ्याच्या अनागोंदीमुळे झोपडीधारकांवर रस्त्यावर येण्याची वेळ; शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी

मंत्री गिरीश महाजन यांना आहेत ‘या’ सवयी, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य !

एशिया कपसाठी टीम इंडिया सज्ज; कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वात ‘या’ खेळाडूंना संधी

पायोनिअर, नवभारत, सहारा, टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टाइम्स अशा विविध दैनिकात अतुल कांबळे यांनी काम केले आहे. मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ कमर्शियल आटर्स येथून कांबळे यांनी छायाचित्र कलेचे प्रशिक्षण घेतले आहे. तेथे त्यांना व्ही. एस. निबरे यांचे मार्गदर्शन लाभले. छायाचित्रकार म्हणून अतुल कांबळे हे गेल्या २५ वर्षापासून छायाचित्रकार म्हणून कार्यरत आहेत. राज्य तसेच देश पातळीवरचे विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. या यशाचे श्रेय तो आई- वडिलांना देतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी