मुंबई

विषारी हवेने घेतला १३,४४४ मुंबईकरांचा बळी

देशातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून राजधानी दिल्लीची ख्याती आहे. पण मागील काही दिवसांपासून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने दिल्लीला प्रदूषणाच्या बाबतीत मागे टाकले आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसागणिक खालावत चालली असून या विषारी हवेने मुंबईकरांना तीव्र श्वसनाचे विकार जडू लागले आहेत. अस्थमा, न्यूमोनिया, ब्रॉन्कायटिसची तीव्र लक्षणे यांसारख्या आजारांमुळे १३,४४४ मुंबईकरांना जीव गमवावा लागला आहे. (Toxic air killed 13,444 Mumbaikars) २०१७ ते २०२१ या पाच वर्षांच्या कालावधीत प्रदूषित हवेमुळे १३,४४४ मुंबईकरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी उघडकीस आली आहे. न्यूमोनिया आणि अस्थमा या आजाराने १००० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

धूम्रपान, आनुवंशिक आजार आणि प्रदूषित हवा हे सर्व घटक श्वसनाचे विकार जडण्यास जरी कारणीभूत असले तरी औद्योगिक प्रदूषण, वाहनांच्या धुराने होणारे प्रदूषण आणि व्यावसायिक कारणास्तव होणारा अस्थमा यामुळे सुद्धा मुंबईकरांना हे आजार होत आहेत, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. खासगी रुग्णालयातील श्वसनविकार तज्ज्ञांनी सांगितले की, न्यूमोनियामुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांमध्ये ६५ वर्षांवरील वृद्ध आणि एक वर्षाच्या आतील बालकांचा समावेश आहे. सुरुवातीलाच जर का श्वसनाच्या समस्येबाबत जाणीव झाली तर या विकारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे, असे शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित रुग्णाला श्वसनाचा संसर्ग झाल्याचे उशिरा लक्षात आल्यास वैद्यकीय उपचारांसाठी होणारा खर्च रुग्णाच्या आवाक्याबाहेर जातो, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’ या संस्थेने २०२० साली प्रसिद्ध केलेल्या अहवालात मुंबई महानगर प्रदेशातील औद्योगिक क्षेत्रांमुळे मुंबई परिसरातील हवा प्रदुषित होत असल्याचे नमूद केले आहे. ट्रान्स-ठाणे, तळोजा, अंबरनाथ आणि डोंबिवली या चार प्रमुख औदयोगिक वसाहतींमध्ये कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे मुंबई परिसरातील हवेचा स्तर खालावला असल्याचे या अहवालात म्हंटले आहे.

बोरिवलीतील ‘ऍपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल’चे फुफ्फुसशास्त्रज्ञ डॉ. पार्थिव शाह यांनी सांगितले की, “मुंबई आणि मुंबई महानगर परिसरात हवेतील प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. मुंबईकरांना सध्या लहरी हवामान अनुभवायला मिळत आहे. सकाळी थंड वारा सुटलेला असतो तर दुपारी हवेत प्रचंड असतो. या विचित्र वातावरणामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गरोदर स्त्रियांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.”

हे सुद्धा वाचा

दादरचे शिवसेना भवन ठाण्यात स्थलांतरित

Post Budget : हरित ऊर्जा विकासावर पंतप्रधान मोदींच पहिलं वेबिनार

फुकटचे बुडबुडे फोडू नका, ५६ इंचाची छाती काय असते ते जावेद अख्तरांकडून शिका! ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

टीम लय भारी

Recent Posts

पॉप, पार्टी आणि पॉर्न अशी अश्लील संस्कृती रुजविण्याचा उद्धव ठाकरेंचा किळसवाणा उद्योग

छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे पॉप, पार्टी आणि पॉर्न…

9 mins ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत       (wealth) पाच…

16 mins ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

36 mins ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

1 hour ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

7 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

8 hours ago