33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeमुंबईUddhav Thackeray : अमित शाहांना उद्धव ठाकरेंचे आव्हान

Uddhav Thackeray : अमित शाहांना उद्धव ठाकरेंचे आव्हान

सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज गट प्रमुखांना संबोधीत केले. गोरेगावच्या नेस्को संकुलामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. चला मुंबई जिंकू या असे घोषवाक्य या सभेमध्ये होते. या वेळच्या व्यासपीठाचे आकर्षण होते. ते संजय राऊत यांच्या खुर्चीचे. व्यासपीठावर संजय राऊत यांच्या नावाने प्रतिनीधीक स्वरुपात खुर्ची ठेवण्यात आली होती.

सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज गट प्रमुखांना संबोधीत केले. गोरेगावच्या नेस्को संकुलामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. चला मुंबई जिंकू या असे घोषवाक्य या सभेमध्ये होते. या वेळच्या व्यासपीठाचे आकर्षण होते. ते संजय राऊत यांच्या खुर्चीचे. व्यासपीठावर संजय राऊत यांच्या नावाने प्रतिनीधीक स्वरुपात खुर्ची ठेवण्यात आली होती. पक्ष संजय राऊत यांच्या सोबत पक्ष आहेत. तसेच संजय राऊत पक्षासोबत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर, आदेश बांदेकर, अनंत गीते, तसेच माजी महापौर किशोरी पेडणेकर, रावते, सुभाष देसाई, निलम गोरे, सुन‍िल प्रभु, अनिल परब, मिलींद नार्वेकर, लिलाधर डाके, विशाखा, मन‍िषा कायंदे, सुषमा अंधारे आदी नेते उपस्थित होते.

सत्तांतरानंतर पाहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी पाहिल्यांदाच भाषण केले. त्यांच्या सोबत रश्मी ठाकरे देखील होत्या. या सभेला महिला शिवसैनिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी‍ किशोरी पेडणेकर यांनी बंडखोर नेत्यांवर तोफ डागली. गोविंदाच्या आरक्षणावर देखील त्यांनी तोफ डागली. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक पोहोचले होते. भास्कर जाधव यांनी त्यांच्या आक्रमक शैलीमध्ये एकनाथ शिंदेगट आणि भाजपवर तोफ डागली. खासदार अरव‍िंद सावंत यांनी देखील यावेळी आपले मत व्यक्त केले. मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे या सभेला थोडा उशीर झाला. यावेळी सभेला अद‍ित्य ठाकरें बरोबर तेजस ठाकरे देखील पोहोचले होते. सभेआधी तेजस ठाकरेंचे बॅनर झळकले होते. आशा प्रकारे सभास्थळी उद्धव ठाकरे सहकुटूंब पोहोचले.

22 हजार खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी आज बंडखोरांची चांगली खरडपट्टी काढली. कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंनी केलेल्या कमगिरीचे सर्वांनी कौतुक केले. या सभेला मोठया संख्येने शिवसैन‍िक ‍हजर होते. आगामी महानगर पालिका निवडणुकासंदर्भात ते काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. दसरा हा परंपरेने शिवतीर्थांवरच होणार याची ग्वाही यावेळी उद्धव ठाकरेंनी दिली. संजय राऊत मोडेनपण वाकणार नाही या निश्चियाने लढतोय. मुले पळवणारी टोळी ऐकलीय पण बाप पळवणारी औलाद राज्यत आता तयार झाली आहे. व्यासपीठावर आल्यावर वडील आहेत का आमचे ते पाहिले. मुंबई गिळायला आले आहे. गिधाडांना मुंबईचे लचके तोडू देवू नका. अमित शहांना माहित नाही ही नुसती जमीन नाही. तर ही गवताची पाती नाहीत तर तलवारीचे पाते.

भाजपला आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही. आमच्या अंगावर आल्यावर राजकारणात कोथळा काढू. कमळाबाईचा आणि मुंबईचा संबंध काय कमळाबाई हा शब्द बाळासाहेबांनी दिला आहे. वंशवादावर टीका करते, घरावर टीका होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ होती त्यात पहिल्या आग्रणी नेत्यांमध्ये माझो आजोबा होते असे उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले. गद्दारांची लक्तरं दसऱ्याला काढणार. 25 वर्षे अमची युतीमध्ये सडली, असा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी काढली. माझे वडील, माझे काका मराठी माणसांसाठी लढत होते. सत्तर वर्षांनंतर चित्ता आणला. चित्ता कधी डरकाळी नाही फोडत. आम्ही पेंग्वीन आणले. चित्ता सोडला आणि फोटो काढले यावर पंतप्रधानांवर टीका केली.

वरळी डेरीकडे मत्सालय झाले पाहिजे. वेदांत प्रकल्प गेल्यावर खोटे बोलतात. गेलेला वेदांत परत आणण्यासाठी मी तुमच्या सोबत येतो. द‍िल्लीत ठणकावून का सांगत नाही. वेदांत प्रकल्प तिकडे नेण्याचे आधीच ठरले होते. शिवसेनेच्या हातात मुंबईकरांनी आपले आयुष्य सोपवले आहे. नैसर्गीक आपत्ती , हल्ल्यात प्रत्येक वेळी हल्ल्यात शिवसैन‍िक धावून जातो. अनेक संकटे ही शिवसैन‍िकांमुळे टळले आहे. अनेक‍ शिवसैनिकांना लेप्टो आजार झाले होते. त्यातल्या एकाला डॉक्टरांनी वाचवले. तोच मी विजय गुरव मला पुन्हा भेटला. वळूंज नावाच्या एकाने दोन मुलींना वाचवले. शिवसनेने त्याच्या बह‍िणीला नोकरी दिली. कुटुंबाला आधार दिला. कसाबने हल्ला केला होता.

त्यावेळी नरीमन भवन तिथे शाखेच्या शिवसैनिकांनी कमांडोना चहा पाणी जेवण दिले. चार श‍िवसैनिक आतिरेक्यांबरोबर लढत होते. एक जणाचा बळी गेला होता. अनेक जण कोवीडमध्ये गेले. एक तरी भाजपवाला पुढे आला का असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. जिंकण्यासाठी पहिली मुंबईकरांची मनं जिंका. आमचे शाखा प्रमुख‍ आहोरात्र मेहनत करतात. गट प्रमुख हे माझे वैभव आहेत. बदल करायचा आहे. कसला बदल. आमचं ठरलंय. काय ठरलं, मुंबई विकायची. दिल्लीश्वरांच्या चरणी वाहायची. आमही जे बोलतो ते करतो. आम्ही 500 फूटांपर्यंत मालमत्ता कर रद्द केला. त्याच मुंबई पालिका शाळेबाहेर रांग लागते.

व्हर्च्युअर क्लास रुम ही संकल्पना पहिल्यांदा सुरू केली. डबल डेकर बसेस इलेक्ट्रॉनी बसेस आणल्या. संपूर्ण देशात आरोग्य विषयक इन्फास्ट्रक्चर उभे केले. कोरोनामध्ये प्राण वाचवले. हा भ्रष्टार केला. आपले सरकार आले हिंदू सणांवरचे संकट टळले. पंढरीच्या वारीला कोणी परवानगी दिली. कोश्यारींनी मला पत्र लिहीले होते. सगळी प्रार्थना स्थळं उघडा. सगळया धार्माची प्रार्थना स्थळं बंद होती. त्यावेळी डॉक्टरांच्यामध्ये देव होता. हे मंदीरे उघडा म्हणत होते. तेव्हा हॉस्पीटल, लसीकरण केंद्र, तपासणी केंद्र उघडत होतो. दिल्लीवरून दबाव येत होते. त्यावेळी मी कडूपणा स्व‍िकारला. सुप्रीम कोर्टाने आपले कौतुक केले आहे. मुंबई सांभाळणं खूप कठीण होते. त्याचे कौतुक परदेशातल्या लोकांना आहे. दुसऱ्यांनी चांगले काम केले तरी म्हणतात. भ्रष्टाचार झाला म्हणतात.

भ्रष्टाराचा आरोप केलेल्या लोकांना तुम्ही जवळ केले. लगेच क्लीन चीट देऊन टाकले. भाजपने माणसं धुवायची लॉड्री काढलीय काय असा घणाघात केला.‍ शिवसेना कोणाची हा निकाल लोकशाही जिवंत राहणार आहे की, नाही हे ठरवणारा आहे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. न्यायमूर्तीवर माझा विश्वास आहे. निवडणुका कशाला घेताय. वाटा खोके, भ्रष्टाचाराशी लढतांना खोके सरकारवरून बाहेर या. फ‍िरते सरकार, हे घराबाहेर पडले आहात मग का मुली विकल्या जातायता, शेतकरी आत्महत्या करत आहेत. लम्पी रोगावरुन देखील सरकारला धारेवर धरले. कसा करभार चाललाय, शिवसेनेला खतम करण्यासाठी सर्वजण एकत्र येत आहेत.

हे सुद्धा वाचा

Sharad Pawar : राज्याच्या प्रमुखाने बाकीच्या गोष्टी सोडून राज्याच्या प्रशासनावर लक्ष द्यावे, शरद पवारांचा कानमंत्र

Tirupati Balaji : मुस्लिम जोडप्याचे तिरुपती बालाजीला कोटींचे दान

ED : पत्राचाळ बैठकीला ‘दोन’ माजी मंत्री हजर असल्याचा ईडीचा आरोप

तुमची ताकद विरोधकांना कळली आहे. मुन्नाभाई सोबत घेतलाय. उद्धव ठाकरेंना संपवा. शिवसैनिकांची मनं मेलेली नाही. शिवसेनेच्या वाटेला यायचा प्रयत्न करून नका अशी तंबीच त्यांनी यावेळी दिली. शिवसेना रस्त्यावर पडलेली नाही. गोचीडी होत्या गळून गेल्या. मुठभर मर्द सोबत असतील तर मला कशाची पर्वा नाही. तुमच्या आयुष्यातली ही शेवटची निवडणूक आहे. आपल्या आयुष्यातली ही पहिली निवडणूक आहे. नव्याने भगवा लावायचा आहे. खळाळता झरा मला तुमच्यामध्ये बघायचा आहे. प्रत्येक शाखेत गटप्रमुख, शाखा प्रमुख असलेच पाहिजे. करून दाखवलं. पंतप्रधान मुंबईत येत आहेत. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी येत आहेत.

आपल्याला जमीन दाखवणाऱ्यांना आस्मान दाखवण्याची आपली तयारी आहेत. का मी आम‍ित शहांना आव्हान देतोय. तुमचे कोणतेही डावपेच चालणार नाही. कोरोना काळात मी कोणताही भेदभाव न करता मी सर्वांचे प्राण वाचवले आहेत. केवळ मतं मिळावे मुस्लिम, गुजराती, उत्तभारतीय,तोडा फोडा आणि राज्य करा हे होणे शक्य नाही. हिंदू मुसलमान चेले चपाटे बसले आहेत त्यांना मुंबई पालिका निवडणूक आणि विधानसभेची निवडणुका लावून दाखवा, खुस्ती आम्हाला येते. शिवसेनेचे काही नगरसेवक जे जाणार आहेत. त्यांना जाण्याचे आव्हान केले. इमान विकलेल्यांना मी डांबून ठेवणार नाही. शिवसेना पहिल्यांदा फूटली नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी