30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeमनोरंजनRaju Srivastav : एकेकाळी 50 रुपये मानधन घेणारा 'राजू' बनला विनोदाचा बादशाह

Raju Srivastav : एकेकाळी 50 रुपये मानधन घेणारा ‘राजू’ बनला विनोदाचा बादशाह

तब्बल 42 दिवस मृत्यूला झुंज दिल्यानंतर विनोदवीर राजू श्रीवास्तव यांनी अखेर बुधवारी (ता. 21 सप्टेंबर) सकाळी जगाचा निरोप घेतला. 10 ऑगस्ट 2022 रोजी राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तब्बल 42 दिवस मृत्यूला झुंज दिल्यानंतर विनोदवीर राजू श्रीवास्तव यांनी अखेर बुधवारी (ता. 21 सप्टेंबर) सकाळी जगाचा निरोप घेतला. 10 ऑगस्ट 2022 रोजी राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजू श्रीवास्तव त्यांच्या जीममध्ये वर्कआऊट करत असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांच्यावर एंजिओग्राफीची शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर अनेक दिवस त्यांची तब्येत खालावली असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत होते. अखेर 42 दिवसांची राजू श्रीवास्तव यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र, एकेकाळी केवळ 50 रुपये मानधन घेणारा साधा कलाकार विनोदाचा बादशाह कसा बनला याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.

राजू श्रीवास्तव यांचा जन्म 1988 साली एका कवी घराण्यात झाला होता. राजू यांना लहानपणापासूनच लोकांना हसवण्याची आवड होती. त्यामुळे आपली आवड जोपासत विनोदवीर होण्यासाठी राजू यांनी थेट मुंबई गाठली. एका मुलाखतीदरम्यान राजू यांनी आपल्या मनातील दु:ख उघड करत सांगितले की, “मी ज्यावेळी मुंबईत आलो होतो त्यावेळी विनोदी कलाकारांना लोकांकडून हवे तितके प्रोत्साहन मिळत नव्हते. त्यावेळी विनोद जॉनी वॉकरपासून सुरू होऊन जॉनी लिव्हरपर्यंत येऊन संपत असे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात काम मिळवण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली आणि त्यामुळे पैशांची अडचण मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली होती.”

50 रुपये मानधनावर झाली विनोदवीराची सुरुवात
राजू श्रीवास्तव यांनी एकेकाळी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा चालवल्याचेही त्यांनी अनेकदा सांगितले आहे. मुलाखतीत त्यांनी या गोष्टीचा खुलासा करताना सांगितले होते की, त्यांच्या रिक्षातील लोकांना हसवण्यासाठी अनेकदा ते त्यांना जोक्स सांगत. त्यांच्या या कलाकृतीमुळे त्यांना रिक्षा भाड्यासोबत प्रवाशांकडून अधिकचे पैसे टीप स्वरुपात मिळतत. त्यातीलच एका प्रवाशामुळे त्यांना विनोद श्रेत्रात पहिले काम मिळाल्याचेही राजू यांनी सांगितले होते. ज्यावेळी त्यांना विनोद क्षेत्रात पहिले काम मिळाले त्यावेळी लोकांचे मनोरंजन करण्यासाठी विनोदवीरांना केवळ 50रुपये मानधन देण्यात येत होते.

गजोधर भैयामुळे घराघरात पोहचला राजू श्रीवास्तव
राजू त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात बर्थडे पार्टीत जाऊन लोकांचे मनोरंजन करत असत. त्यानंतर अनेक काळ मेहतन केल्यानंतर राजू यांना खरी ओळख मिळाली ती म्हणजे लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून. राजू श्रीवास्तव हे या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ स्पर्धेचे उपविजेते होते. या स्पर्धेत त्यांनी साकारलेले ‘गजोधर भैया’ हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आणि त्याच्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यात राजू श्रीवास्तव यांना लोकांचे प्रेम मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अनेक ठिकाणी आपली कला सादर करत असताना राजू श्रीवास्तव ‘गजोधर भैया’ला आपल्या सोबत घेऊन लोकांचे मनोरंजन केले.

हे सुद्धा वाचा

Raju Srivastav Passed Away : हास्यवीर राजू श्रीवास्तव यांनी घेतला अखेरचा श्वास

Raju Srivastav : 15 दिवसानंतर कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत झाली सुधारणा

Tirupati Balaji : मुस्लिम जोडप्याचे तिरुपती बालाजीला कोटींचे दान

दरम्यान, कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जात राजू श्रीवास्तव यांनी आपली एक ओळख निर्माण केली. ही ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली. त्यामुळेच आजवर विनोद क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेली पात्र अजरामर आहेत. विनोदाच्या या बादशाहाने जगाचा निरोप घेतल्यानंतर संपूर्ण भारतभरात शोक व्यक्त केला जात आहे. आज राजू श्रीवास्तव आपल्यातून गेले असले तरी, त्यांनी जिवंत केलेला गजोधर भैया नेहमी स्मरणात राहिल अशी ग्वाही सिनेसृष्टीतून व्यक्त केली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी