27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
HomeमुंबईED : पत्राचाळ बैठकीला ‘दोन’ माजी मंत्री हजर असल्याचा ईडीचा आरोप

ED : पत्राचाळ बैठकीला ‘दोन’ माजी मंत्री हजर असल्याचा ईडीचा आरोप

पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत हे तुरुंगात आहेत. त्या प्रकरणाची ईडी (ED) चौकशी करत आहे. या प्रकरणात अनेक नावे पुढे येत आहेत. मात्र या प्रकरणात शरद पवार यांचे नाव समोर आल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत हे तुरुंगात आहेत. त्या प्रकरणाची ईडी (ED) चौकशी करत आहे. या प्रकरणात अनेक नावे पुढे येत आहेत. मात्र या प्रकरणात शरद पवार यांचे नाव समोर आल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 2006 ते 2007 या काळात गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणी अनेक बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये म्हाडाचे काही अध‍िकारी तसेच त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि केंद्रीय कृषीमंत्री  शरद पवार हे देखील उपस्थित होते. असे ईडीच्या आरोपपत्रात समोर आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी प्रवीण राऊत  प्रत्यक्षपणे काम करत होते. मात्र याचे संपूर्ण सूत्रधार हे संजय राऊत असल्याचे ईडीने म्हटले आहे.

पत्राचाळ प्रकरणी खूप मोठे वादळ उठले होते. अखेर संजय राऊत यांना तुरुंगात टाकल्यानंतर ते वादळ शमले होते. परंतु पुन्हा या प्रकरणाला वेग येणार आहे.  कारण संजय राऊत यांची कोठडी देखील वाढविण्यात आली आहे. सद्या ते अर्थरोड तुरुंगात आहेत. 4 ऑक्टोबरपर्यंत त्यांची कोठडी वाढव‍िण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Ajit Pawar : अजित पवार आरोप करणाऱ्यांवर चांगलेच संतापले, म्हणाले होऊ द्या…..

Narayan Rane :सीआरझेड उल्लंघन प्रकरणी नारायण राणेंचा बंगला तोडणार, 10 लाखांचा दंडही दयावा लागणार

Actress Samantha Ruth Prabhu : अभ‍िनेत्री सामंथा रुथ प्रभु घेतेय परदेशात उपचार

ईडीने आपल्या आरोपपत्रात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांनी संगनमताने मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे विश्वासू होते. मित्र होते. त्यामुळे ते या प्रकरणात गुंतले गेले. या प्रकरणात गुरू‍ आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला प्रवीण राऊत यांनी 25 टक्के हिस्सा दिला होता. सर्व सूत्र संजय राऊतांच्या हातात होती असे ईडचे म्हणणे आहे.

प्रवीण राऊत यांनी आपल्या जबाबात दावा केला आहे की, पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प 740 कोटी रुपयांचा असून,  25 टक्के शेअर्स असल्याने 180 कोटी रुपये मिळाले असल्याचा ईडीला संशय आहे. सुरुवातीला हा प्रकल्प 13.18 एकरचा होता. त्यानंतर तो 47 एकरचा झाल्याचे तपासात सामोर आले आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी