35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईलसीकरण प्रात्यक्षिके जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात?

लसीकरण प्रात्यक्षिके जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात?

टीम लय भारी

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना प्रतिबंध लसीकरणाच्या (vaccine) पहिल्या टप्प्यात सुमारे दहा लाख आरोग्य कर्मचा-यांचे लसीकरण होणार असून याची प्रात्यक्षिके(ड्राय रन) दोन जिल्ह्यांमध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

लसीकरणाची पूर्वतयारी राज्यात सुरू असून यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने तयार केलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपमध्ये आत्तापर्यंत सात लाख खासगी आणि सरकारी आरोग्य कर्मचा-यांची माहिती नमूद केली आहे. यात आणखी तीन लाख आरोग्य कर्मचा-यांची नोंदणी येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. राज्यात जवळपास दहा लाख आरोग्य कर्मचा-यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाईल, अशी माहिती आरोग्य आयुक्तालयाचे आयमुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी दिली.

पंजाब, गुजरात, आसाम आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांत लसीकरणाची प्रात्यक्षिके सोमवारी आणि मंगळवारी घेण्यात येणार आहेत. लशीच्या साठवणुकीसाठी शीतसाखळी निर्माण केली जात असून आरोग्य विभागाच्या मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, लातूर, नागपूर, कोल्हापूर, अकोला अशा प्रमुख विभागीय केंद्रांमध्ये मोठ्या शीतपेट्या (वॉक इन फ्रिजर आणि वॉक इन कुलर) दाखल झाल्या असून बसविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. लसीकरण कसे होईल याची प्रात्यक्षिके राज्यात दोन जिल्ह्यांमध्ये घेण्यात येतील.

मुंबईत १७ आयएलआर दाखल

लशीच्या कुप्यांचे जतन करण्यासाठी १७ आयएलआर (आईस लीन रेफ्रिजरेटर) राज्य आरोग्य विभागाकडून मुंबई पालिकेला प्राप्त झाले आहेत. यातील दहा हे पालिका आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयात बसविण्यात येणार असून अन्य लसीकरण करण्यात येणा-या पालिकेच्या प्रमुख रुग्णालयात लावले जातील, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी