27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमुंबईराऊत शिवसेनेला खड्ड्यात घालत आहेत : आ. प्रसाद लाड

राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालत आहेत : आ. प्रसाद लाड

टीम लय भारी

मुंबई : ‘शिवसेना खासदार संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम करत आहेत. संजय राऊत वारंवार शिवसेनेला आणि शिवसेना नेतृत्वाला फसवण्याचं काम करत आहेत’, अशी घणाघाती टीका भाजप नेते आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केली.

एका लेखात मोदी शहा यांच्या मनमानीने आणि चार-पाच उद्योगपती मिळून देश चालला असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावर बोलताना ‘राऊतांचा आरोप बिनबुडाचा आरोप आहे. वास्तवाशी त्याचा काही संबंध नाही’, असा पलटवार लाड यांनी केला. मोदींवर टीका करण्यापेक्षा राऊतांनी राज्यातलं पाहावं. राज्याला सध्या फुल टाईम मुख्यमंत्र्यांची गरज आहे. आम्ही पण म्हणू शकतो की एकच माणूस महाराष्ट्र चालवतोय. पण सरकारमधील मंत्री आणि पक्ष आपापल्या पद्धतीनुसार निर्णय घेत असतो. हा सरकार आणि पक्षीय पातळीवर ज्याचा त्याचा विषय आहे, असं लाड म्हणाले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आलेली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अगदी दोन महिन्याच्या आतच त्यांना ईडीची नोटीस आली आहे. याविषयी दरेकर यांना विचारलं असता ते म्हणाले, ‘जर नाथाभाऊंनी काही चूक केली नसेल तर त्यांनी घाबरुन जाऊ नये. ईडीला सहकार्य करावं आणि राहिला विषय त्यांच्या सीडीचा. तर त्यांच्याकडे असलेली सीडी त्यांनी खुशाल लावावी, असं आव्हानही लाड यांनी नाथाभाऊंना दिलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी