33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयशरद पवार म्हणाले, अशा प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आली आली आहे

शरद पवार म्हणाले, अशा प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आली आली आहे

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकमध्ये पक्षाचे उमेदवार उभे केले असून शरद पवार यांनी आज निपाणीमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी भाजप पैशाचा वापर करुन तसेच माणसे फोडून सरकार पाडते अशा प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आली असल्याचे ते यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार आज निपाणीत आले होते. यावेळी त्यांनी लोकांच्या समस्या, शेतीचे प्रश्न आणि विकास या मुद्द्यावर राष्ट्रवादीला मते देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय घेतला की या राज्यातील सामान्य माणसाचे दुखणे, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विकासासंबंधीची भूमिका गतिमान करण्यासाठी आपले उमदेवार उभे केले पाहिजेत. यातून संपूर्ण कर्नाटकला कळेल की कर्तृत्व आणि विकास याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.

यावेळी शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली, ते म्हणाले. आज देशात नवनवीन समस्या दिसत आहेत, मणिपूरमध्ये संघर्ष सुरु आहे. तेथे भाजपची सत्ता आहे. मात्र ज्यांच्या हाती देश आहे त्यांना मणिपूर सांभाळता येत नाही, आणि मतं मागण्यासाठी कर्नाटकात हिंडत आहेत. कर्नाटकात भाजपची सत्ता आहे. मात्र अनेक ठिकाणी भाजप सत्तेत निवडून आला नाही, महाराष्ट्रात त्यांनी ठाकरेंचे सरकार फोडून सत्तांतर केले. अशी अनेक राज्ये सांगता येतील जिथे धनाचा वापर करुन माणसे फोडून सरकार बनवण्याची सत्ताधाऱ्यांनी भूमिका घेतली आहे. कर्नाटक देखील त्याला अपवाद नाही. त्यामुळे देशात पैशाचा वापर करुन राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आली आहे, असे पवार म्हणाले.

पुढे बोलताना पवार म्हणाले, कर्नाटकची चर्चा संपूर्ण देशात चाळीस टक्क्यांचे सरकार म्हणून होत असेल तर एवढी कर्नाटकची बदनामी कोणीही केली नाही. त्याची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवसाला अशुभ म्हटले जाते. अशा महान व्यक्तीबद्दल असे वक्तव्य होत असेल तर यातून कष्टकरी, कर्तृत्ववान आणि मागासवर्गीय वर्गाची बदनामी केली गेली, असे म्हणणे चुकीचे होणार नाही.

हे सुद्धा वाचा

रुपया ‘ग्लोबल’चे मिशन भंगले, मोदींनी देशाची अब्रू घालवली

कळंबोलीत ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याची डोक्यात, मानेवर वार करुन हत्या

मणिपूरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी थोड्याच वेळात मुंबईत पोहचणार

शेतऱ्यांना सन्मानाने जगण्याची स्थिती केली नाही तर देश चालू शकत नाही. कर्नाटकात वीज, पाणी अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. निपाणीत आधी तंबाखूचे पीक घेतले जात असे, आता ऊसाचे पीक घेतले जाता. जनतेने उत्तमराव पाटील यांना विजयी केल्यास ऊसाला अधिकची किंमत कशी मिळेल यासंबंधीचे मार्गदर्शन त्यांना निश्चित करू असे पवार यावेळी म्हणाले. यापूर्वी काकासाहेब पाटील यांना या भागातून आपण दोन वेळा निवडून जरी दिले असले तरी कुठे थांबायचे हे जर त्यांना कळलं नाही तर अपघात होतो. या निवडणुकीत त्यांचा अपघात होईल यात शंका नाही. त्यामुळे आपले मत वाया जाऊ देऊ नका, असे आवाहन देखील शरद पवार यांनी यावेळी केले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी