33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईमहिला पोस्टमनवर सरकारकडून अन्याय, ३५ वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत

महिला पोस्टमनवर सरकारकडून अन्याय, ३५ वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत

रवींद्र भोजने : टीम लय भारी

 मुंबई : पोस्ट विभागात महिला पोस्टमन म्हणून नोकरी करणारी महिला न्यायासाठी गेल्या 35 वर्ष पोस्ट मुख्यालयाच्या चकरा मारीत आहे. पोस्ट विभागात काम करणाऱ्या महिला पोस्टमनला काही कारणास्तव नोकरी गमवावी लागली होती. परंतु याबाबत तिने 35 वर्ष तिने संघर्ष केला तरी देखील तिला अद्याप नाय न मिळालेला नाही. सपना एस. परब असे सदर महिलेचे नाव आहे.(woman postman has been waiting for justice justice for 35 year)     

याबाबत सपना परब म्हणाले की,  सन 1980 – 81 साली पोस्ट खात्यात ती रीतसर परीक्षा देऊन वडाळा येथे ट्रेनिंग पूर्ण करून वांद्रे पूर्व पोस्ट ऑफिस येथे महिला पोस्टमन या पदावर रुजू झाली होती. पोस्ट खात्यातील काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागळे  नाही म्हणून पोलिसांमार्फत केस दाखल केली.

सदर प्रकरणात 1990 साली मला वांद्रे पूर्व  12 वे न्यायालयाने निर्दोष सोडले. पण पोस्ट खात्याने मला 20 ऑगस्ट 1986 रोजी 48 तासांच्या वर जेलमध्ये राहिले म्हणून निलंबित केले. व जानेवारी 1987 साली मला सेवेतून कमी करण्यात आले. याविरोधात माझ्या युनियन लिडरने यांच्याविरुद्ध कॅटमध्ये केस दाखल केली होती.

हे सुद्धा वाचा 

Modi government : मोदी सरकारच्या काळात शेतक-यांचे ९५ हजार कोटींचे कर्ज माफ

Government alert : ‘या’ वेबसाइटवर चुकूनही करू नका क्लिक, अन्यथा…

‘पेगॅसस’ च्या मुद्द्यावरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Karnataka hijab row | Based on HC proposal, K’taka govt may release SOP for head scarfs  

त्याने माझा अर्ज  दाखल करून 1992 ला केस डिसमिस केली.  परंतु या कामी पोटातल्या अधिकाऱ्यांसोबत माझे लीडर सामील होते याची मला माहिती नव्हती व त्यांनी दिलेल्या वकिलाने  माझी बाजू मांडली नाही.

याबद्दल विधी व न्याय विभागाच्या मंत्र्यांना सर्व पुरावे देऊन तसेच कॅटला पोस्टाने खोटे प्रतिज्ञापत्र दिले.त्याबद्दल इतर पुरावे देऊन अर्ज दिला होता. तो त्यांनी राष्ट्रपतींना पाठवला होता. सदर वेळी राष्ट्रपतींचे प्रेसिडेंट से क्रिएट यांनी 2008 साली जनरल पोस्ट मास्तर यांना पत्र पाठवले होते.  सदरचे पत्र पोस्ट खात्याने नॉनकॅलेन यांच्या नावाखाली दडले होते. माझ्या सततच्या मागणीमुळे दडलेले पत्र उघडकीस आल्यानंतर  पोस्ट खात्याने माझ्याकडे कागदपत्रांची मागणी केली व ती सर्व कागदपत्रे अपडेट करून पोस्ट खात्याला देण्यात आली. 30 ऑगस्ट 2010 रोजी पोस्टमास्टर जनरल यांच्याबरोबर एम आर एफ पोलीस ठाण्याच्या मदतीने बैठक झाली होती.

मात्र, अद्याप त्याचे काही उत्तर मिळाले नाही माझी हक्काची पोस्टाची नोकरी परत  मिळावी. यासाठी मला जो आर्थिक संघर्ष करावा लागला त्याची भरपाई देखील देण्यात यावी अशी मागणी सपना परब यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी