33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयआदित्य ठाकरेंनी जमिनीवर बसून जनतेशी साधला संवाद

आदित्य ठाकरेंनी जमिनीवर बसून जनतेशी साधला संवाद

टीम लय भारी

नागपूर: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशारा दिला आहे. तसंच उद्या शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेतली जाणार असून विरोधकांनी ती पहावी असं आव्हानच दिलं आहे.(Aditya Thackeray sat on the ground and interacted with the people)

दरम्यान मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत. परंतु ही वैयक्तिक पत्रकार परिषद नसून शिवसेनेची पत्रकार परिषद असेल असे राऊतांनी सांगितले.  त्यातच आता शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

 नागपूरात आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांनी उद्या पत्रकार परिषद घेणार असून भाजपाचे साडे तीन लोक जेलमध्ये असतील असा दावा केला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपुरातील नांदगाव, वारेगाव येथील प्रदूषणाचा मुद्दा राज्यात गाजल्यानंतर गावकऱ्यांना  सोमवारी येथे भेट दिली.  यावेळी आदित्य ठाकरे यांनी  महाजनकोने टाकलेल्या मंडपात न जाता, थेट गावकऱ्यांनी पंप हाऊसजवळ टाकलेल्या मंडपाला भेट दिली. जमिनीवरच बसून त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.

हे सुद्धा वाचा

हिजाबच्या वादावर आदित्य ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

आदित्य ठाकरे यांची सूचना, महाराष्ट्रात मास्कची सक्ती हटवली जाईल हा गैरसमज काढून टाका

संजय राऊतांच्या भाजप आरोपांवर आदित्य ठाकरेंनी अखेरआपली प्रतिक्रिया दिली आहे…

Aditya Thackeray bats for Maharashtra style of governing state

दरम्यान संजय राऊत यांनी उल्लेख केलेले ते भाजपाचे साडेतीन लोक कोण आहेत यासंबंधी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. आदित्य ठाकरेंनी यानंतर  प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावर आदित्य ठाकरें म्हणाले की, “सामना तर होऊ द्या, आत्ताशी टॉस झाला आहे”  मॅच अजून बाकी आहे. मंगळवारच्या पत्रकार परिषदेसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेना भवन येथे उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी