32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
HomeमुंबईYuva Sena : बोरिवलीत युवासेनेतर्फे अन्नधान्याचे वाटप

Yuva Sena : बोरिवलीत युवासेनेतर्फे अन्नधान्याचे वाटप

टीम लय भारी

मुंबई : युवासेनेतर्फे (Yuva Sena) बोरिवली मागाठाणे विभाग येथे युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या मार्गदर्शनाखाली “अन्नधान्य वाटप किट” (Distribution of food grains) शुभारंभ शिवसेना विभागप्रमुख विलास पोतनीस, युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश रामदास कदम यांच्या शुभहस्ते आज झाले.

पहिल्या टप्प्यात 2500 व्यक्तींना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने वॉर्ड क्र.12 मधील स्थानिक नागरिक, विधवा महिला, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, गॅस सिलेंडर वाटप कर्मचारी यांना आज प्राथमिक स्वरूपात “अन्नधान्य वाटप किट” देण्यात आले.

युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांच्या सहकार्याने युवासेना सिनेट सदस्य शशिकांत झोरे यांनी याचे आयोजन केले होते.

यावेळी उपविभागप्रमुख विनायक सामंत, राजेंद्र पवार, अमोल नाईक, अमित मोरे, बाळा घाडगे, पंकज मसुरकर उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी