35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईयुपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या गुणवंतांचा युवा उत्थान फाऊंडेशन करणार गौरव

युपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या गुणवंतांचा युवा उत्थान फाऊंडेशन करणार गौरव

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत ज्या उमेद्वारांनी उज्ज्वल यश संपादन करुन आता सनदी सेवेत दाखल होणार आहेत अशा गुणवंतांचा सत्कार युवा उत्थान फाउंडेशनच्या वतिने करण्यात येणार आहे.

हा समारंभ मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शनिवारी (दि.10) रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत पार पडणार आहे. युवा उत्थान फाऊंडेशन ही सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. अमोल गवळी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या नेटक्या नियोजनातून हा कार्यक्रम पार पडत आहे.

हे सुद्धा वाचा

व्हॉट्सअॅपचे नवे फीचर – चॅनेल; काय आहे, कसे काम करते ते जाणून घ्या …

शरद पवार औरंगजेबाचा दुसरा जन्म; त्यांनी मुस्लीम धर्मात जावे : निलेश राणे यांच्या वक्तव्याने वादाला तोंड

त्या तरुणीच्या हत्येचे गूढ उलगडले… समोर आलं धक्कादायक कारण

या समारंभाला केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, IAS प्रवीण परदेशी, मुंबईचे सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील, उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिहं कुशवाह सर, भारतीय रेल्वेचे प्रवक्ते शिवाजी सुतार, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, जीएसटी विभागाच्या सहआयुक्त प्रेरणा देशभ्रतार सेन्सॉर बोर्डाचे प्रादेशिक अधिकारी महेश पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी