31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeजागतिकव्हॉट्सअॅपचे नवे फीचर - चॅनेल; काय आहे, कसे काम करते ते जाणून...

व्हॉट्सअॅपचे नवे फीचर – चॅनेल; काय आहे, कसे काम करते ते जाणून घ्या …

व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मद्वारे व्यवसाय, संस्था उपक्रम आणि कंटेंटचे मार्केटिंग करणाऱ्यांसाठी व्हॉट्सअॅपचे नवे चॅनेल फीचर वरदानच ठरणार आहे. या फीचरमधून पैसे कमवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

WhatsApp नेहमीच नवनवीन फीचर्स सादर करीत असते. आता व्हॉट्सअॅपचे नवे फीचर आले आहे – चॅनेल! हे फारच इंटरेस्टिंग असे फीचर आहे. टेलिग्राम चॅनेल आणि नुकत्याच इन्स्टाग्रामसाठी दिलेल्या आपडेटसारखेच हे काहीसे आहे. हे नवे फीचर असलेली अपडेट टॅब तुम्हाला कुटुंब, मित्र आणि कम्युनिटी यांच्याशी नेहमीच्या चॅटपेक्षा वेगळे अन आवडीचे कंटेंट दाखवेल. हे चॅनेल नेमके काय आहे, कसे काम करते ते जाणून घ्या …

चॅनेल नावाचे एक नवीन वैशिष्ट्य व्हॉट्सअॅपने सादर केले आहे. हे अत्यंत उपयुक्त ठरू शकेल असे फीचर आहे. विशेषत: व्यवसाय, संस्था आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी ते अतिशय महत्त्वाचे ठरू शकेल. व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मद्वारे व्यवसाय, संस्था उपक्रम आणि कंटेंटचे मार्केटिंग करणाऱ्यांसाठी व्हॉट्सअॅपचे नवे चॅनेल फीचर वरदानच ठरणार आहे. व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर हे चॅनेल नावाचे नवीन फीचर नव्या अपडेट या टॅबच्या स्वरूपातच युझर्सना दिसू लागेल. या अपडेट टॅबमध्ये युझर्स त्यांनी फॉलो करण्यासाठी निवडलेल्या चॅनेलमधील अपडेट्स पाहू शकतील. WhatsAppच्या या अगदी नवीन वैशिष्ट्याबद्दल आणि ते कसे वापरावे याबद्दल आम्ही तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहोत.

व्हॉट्सअॅपचे नवे फीचर - चॅनेल! व्हॉट्सअॅप चॅनेल!
व्हॉट्सअॅपचे नवे फीचर – चॅनेल! व्हॉट्सअॅप चॅनेल! (फोटो क्रेडिट : मेटा)

व्हॉट्सअॅपने चॅनेल हे फीचर सादर करताना म्हटले, “आज आम्‍ही चॅनेल सादर करताना अतिशय उत्‍साहित आहोत. व्‍हॉट्सअॅपमध्‍येच इतर युझर्स आणि संस्‍थांकडून महत्‍त्‍वाच्‍या अपडेटस् मिळवण्‍याचा हा एक सोपा आणि विश्‍वासार्ह मार्ग ठरेल. शिवाय, तुम्ही जे फॉलो कराल, पाहाल ते गोपनीय राहील. अपडेट नावाच्या नवीन टॅबमध्‍ये युझर्सना त्यांच्या आवडीच्या चॅनेलचे कंटेंट आणि अपडेट्स मिळत राहतील.”

चॅनेल हे ब्रॉडकास्टसारखे वन वे कम्युनिकेशन असलेले फीचर आहे. युझर्सना फॉलो केलेल्या चॅनेलकडून आलेल्या अपडेट्सना रिप्लाय करता येणार नाही. संस्था किंवा कंटेंट क्रिएटर्स त्यांच्या चॅनेलवर मजकूर, फोटो, व्हिडिओ, अगदी स्टिकर्स आणि पोल अशा कोणत्याही स्वरूपात कंटेंट पाठवू शकतात. WhatsApp एक वेगळी डिरेक्टरीही तयार करत आहे. या डिरेक्टरीत युझर्सना त्यांच्या पसंतीनुसार चॅनेल शोधता येईल. युझर्सना छंद व आवडीनुसार त्या विषयांवरील चॅनेल, आवडते क्रीडा संघ, स्थानिक संस्था, अधिकार्‍यांकडून अपडेट्स आणि बरेच काही मिळू शकते.

 

चॅनेलसाठी साइन अप करण्यासाठी फक्त डिरेक्टरी सर्च हाच एकमेव मार्ग नाही. युझर्स हे चॅट, ई-मेल किंवा इन्व्हिटिशन लिंक्सवरून देखील एखाद्या चॅनेलला जॉइन होऊ शकतात. आता आपण एखाद्या ग्रुप जॉइनसाठी पाठवतो, तशाच धर्तीवर या इन्व्हिटिशन लिंक्स ऑनलाइन पोस्ट करता येऊ शकतील.

चॅनेल फीचर वापरताना व्हॉट्सअॅप युझर्सची माहिती, फोन नंबर गोपनीय ठेवला जाणार आहे. चॅनेल अॅडमिनचा फोन नंबर आणि प्रोफाइल फोटो फॉलोअर्सना दाखवला जाणार नाही. त्याचप्रमाणे, एखाद्या चॅनेलला फॉलो केल्याने युझर्सचा फोन नंबर व माहिती चॅनेल अॅडमिन किंवा इतर मेंबर्सना उघड होणार नाही. युझर्सनी कोणाला फॉलो करायचे, ही त्यांची निवड स्वत:ची निवड राहील, तो खासगी अधिकार असेल.

हे सुद्धा वाचा :

Whatsapp वापरकर्त्यांसाठी जबरदस्त अपडेट; आता चार मोबाईलमध्ये चालणार एक अकाउंट! जाणून घ्या कसे

Whatsapp Features : व्हॉट्सऍपवरील आपत्तिजनक फोटो, व्हिडिओ असे करू शकता ब्लॉक

WhatsApp चॅट तुम्ही लपवू शकता, ही सोपी ट्रिक माहित आहे का?

चॅनेलमधील अपडेटस् सर्व्हरवर 30 दिवसांपर्यंत राहतील. फॉलोअरना चॅनेलवरून स्क्रीनशॉट आणि फॉरवर्ड करण्याची सुविधा ब्लॉक करण्याचा पर्याय अॅडमिन असेल. चॅनेल कंटेंट कुणाला पाठवायचे हे अॅडमिन ठरवू शकतील. त्यांचे चॅनेल व्हॉट्सअॅप डिरेक्टरीत सर्च होण्यायोग्य असावे की नाही, यावरही अॅडमिनचे नियंत्रण असेल.

 

चॅनेल हे नवीन फीचर तूर्तास कोलंबिया आणि सिंगापूरमध्ये उपलब्ध होईल. येत्या काही महिन्यांत, ते आणखी काही देशांमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. या फीचरमधून पैसे कमवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. सिंगापूर हार्ट फाउंडेशन आणि फॅक्ट-चेकर कोलंबिया चेक सारख्या संस्था सध्या त्या देशातील युझर्सना कंटेंट डिलीव्हरी करण्यासाठी व्हॉट्सअॅप चॅनेल सुविधेचा वापर करणार आहेत. आंतरराष्ट्रीय बचाव समिती (IRC), वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) तसेच FC बार्सिलोना आणि मँचेस्टर सिटी सारख्या प्रख्यात क्रीडा संघही व्हॉट्सअॅपवर चॅनेल सुरू करत आहेत.

येत्या काही काळात युट्यूबसारखेच कुणालाही व्हॉट्सअॅपवर चॅनेल सुरू करता येऊ शकेल. मात्र, ती पेड सर्व्हिस असेल. फक्त व्हीडिओच नव्हे तर कोणत्याही स्वरूपातील कंटेंट या चॅनेलच्या माध्यमातून कमी पैशात प्रसारित करणे शक्य होणार आहे.

WhatsApp Channels, WhatsApp new feature, Channels, Meta, how WhatsApp Channels works

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी