34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयनाना पटोलेंचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; मोदी सरकार कुंभकर्णासारखे झोपले आहे

नाना पटोलेंचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; मोदी सरकार कुंभकर्णासारखे झोपले आहे

टीम लय भारी

मुंबई :- देशात सततच्या वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता त्रासून गेली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व जिवनावश्यक वस्तूंच्या किंमती आकाशाला पोहोचल्या आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे जुलमी, अत्याचारी सरकारमुळे जनतेचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकार मात्र कुंभकर्णासारखे झोपले आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे (Nana Patole scathing attack on Modi government).

या सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचा खिशाला कात्री लागली आहे. या मोदी सरकारला सर्वसामान्यांची काहीही काळजी नाही आहे. मोदी सरकार हे जुलमी सरकार आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत असे नाना पटोले म्हणाले आहेत (Nana Patole has said that the people are suffering the consequences of the wrong economic policies of the Modi government).

अरे भाई गुस्से की बात नही, मला पवारसाहेबांचे निमंत्रण नव्हते; नाना पटोले

नाना पटोलेंचा आरोप राष्ट्रवादीने फेटाळला

केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार इंधन, गॅस, खाद्यतेल डाळींची महागाई करून जनतेला आर्थिक कमजोर करत आहे. कोरोनामुळे लोकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली असताना महागाईच्या ओझ्याखाली गोरगरिब, मध्यमवर्ग, नोकरदारही पिचला गेला आहे. इंधनावरील कराच्या रुपाने केंद्र सरकार आपली झोळी भरत असून दररोजच्या महागाईने जनतेचे मात्र कंबरडे मोडले असून मोदी सरकार मात्र कुंभकर्णासारखे झोपले आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

महागाई व इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस नेत्यांनी आज मलबार हिल येथील हँगिंग गार्डन येथून सायकल रॅलीने राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. इंधन दरवाढ, महागाईबरोबरच, मराठा, ओबीसी आरक्षण आणि कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांना निवदेन दिले.

नाना पटोलेंच्या मागणीला यश; फोन टॅपिंग प्रकरणा संदर्भात समिती गठीत

After Sharad Pawar straight-talk with Cong leaders, Nana Patole says NCP chief is ‘govt’s remote control’

प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असतानाही भारतात पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती दररोज वाढत आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. शेजारच्या राष्ट्रांना भारत पेट्रोल, डिझेल ३० रुपये लिटरने देत असून आपल्याच नागरिकांना मात्र पेट्रोलसाठी १०७ रुपये तर डिझेलसाठी ९६ रुपये मोजावे लागतात.

इंधनावरील एक्साईज ड्युटी, रस्ते विकास सेस व कृषी सेसच्या माध्यमातून केंद्र सरकार भरमसाठ कमाई करत आहे. सेसमधून राज्य सरकारला एक रुपयाही मिळत नाही. गत ७ वर्षात इंधनावरील करातून मोदी सरकारने तब्बल २५ लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली आहे.

Nana Patole scathing attack on Modi government
नाना पटोले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

इंधनाचे भाव दररोज वाढत असताना त्यातून केंद्रातील भाजपा सरकार जनतेला काहीच दिलासा देत नाही उलट भाजप नेते राज्य सरकारने कर कमी करावेत असा उफराटा सल्ला देत आहेत. राज्य सरकारचे इंधनावरील कर हे केंद्र सरकारपेक्षा फारच कमी आहेत. केंद्र सरकार कररुपाने आपली तिजोरी भरत आहे. उलट राज्य सरकारच्या हक्कांचा जीएसटी परतावाही केंद्र देत नसतानाही इंधन दरवाढीतून जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी राज्य सरकारवर ढकलणे ही भाजपाकडून केली जाणारी दिशाभूल आहे.

यावेळी विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री विश्वजित कदम, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, यांच्यासह इतर पदआधिकारी उपस्थित होते.

Why everyone’s upset with Maharashtra Congress chief Nana Patole — Sena, NCP & his own party

इंधन दरवाढ व महागाईविरोधात प्रदेश काँग्रेस राज्यभर विविध आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निषेध करत आहे. महसुल विभागीय आयुक्त मुख्यालयी सायकल रॅली काढण्यात आली, महिला काँग्रेसने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटवून महागाईचा निषेध केला. जिल्हा, तालुका स्तरावरही आंदोलन करुन सरकारचा निषेध करण्यात आला. पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या सह्यांची मोहिम राबवण्यात आली. युवक काँग्रेस, एनएसयुआय, सर्व फ्रंटल व सेलच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या आंदोनात सहभाग घेतला. ७ जुलैपासून सुरु असलेले हे आंदोलन १७ जुलैपर्यंत चालू राहणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी